Chandrayaan 3 In Moon’s Orbit:…तर चंद्रयान 10 दिवसात पृथ्वीवर परतणार
चंद्रयान 3 आता मोहिमेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. पण इतकं जवळ पोहोचून सुद्धा जर चंद्रयान 3 ला चंद्राची कक्षाच पकडता आली नाही तर काय? असे झाल्यास चंद्रयान 3 साधारण 10 दिवसांनी 236 किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीवर परतणार आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 In Moon’s Orbit:चंद्रयान 3 आता मोहिमेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. पण इतकं जवळ पोहोचून सुद्धा जर चंद्रयान 3 ला चंद्राची कक्षाच पकडता आली नाही तर काय? असे झाल्यास चंद्रयान 3 साधारण 10 दिवसांनी 236 किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीवर परतणार आहे. पण आता चंद्रयान 3 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी नेमक्या काय अडचणी येणार आहे? वैज्ञानिकांना काय मेहनत घ्यावी लागणार आहे,हे जाणून घेऊयात. (chandrayaan 3 if moon orbit in not cought it will return in 230 hours)
ADVERTISEMENT
किती इंधन बाकी?
चंद्रयान 3 सध्या चंद्राच्या दिशेने आहे. 1 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री 12.03 से 12.23 वाजता ट्रान्स चंद्रावर मार्गक्रमन करतोय. या दरम्यान प्रोपल्शन मॉड्यूल (प्रमाण मॉड्यूल) च्या इंजिनला 20 मिनिटांसाठी चालू करण्यात आले होते. यामध्ये चंद्रयान 3 ने आतापर्यंत 179 किलोग्रॅंम इंधन खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. याचाच अर्थ पृथ्वीच्या पाचही कक्षेत इंधन 500-600 किलोग्रॅम खर्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चंद्रयान 3 लॉंचिंगच्या वेळेस प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये 1696.39 किलोग्रॅम इंधन होते. म्हणजेच अजूनही 1100-1200 किलोग्रॅम इंधन चंद्रयानमध्ये उरले आहे.
चंद्रयान 3 चंद्रापर्यंत 5 ऑगस्टपर्यंत प्रवास करणार आहे. 5 ऑगस्टच्या संध्याकाळी 7 किंवा साडे सात दरम्यान त्याला चंद्राच्या कक्षेत घातले जाणार आहे. चंद्राभोवती पाच वेळा घिरट्या घालून त्याची कक्षा कमी केली जाणार आहे. साधारण चंद्रयानला 100 किलोमीटरच्या कक्षेत आणले जाणार आहे. ही गोष्ट 17 ऑगस्टला पूर्ण होणार आहे.
हे वाचलं का?
याच दरम्यान प्रोपल्शन मॉड्यूल आणि लॅंडर मॉड्युल एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. 18 आणि 20 ऑगस्टला लॅंडर मॉड्युलची डीऑर्बिटिंग होईल. म्हणजेच चंद्रयान 3 चा लँडर मॉड्यूल हळू हळु चंद्राच्या 100×30 किलोमीटरच्या कक्षेत (Orbit) जाईल. त्यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावने 6 वाजता तो चंद्रावर उतरेल.
ADVERTISEMENT
चंद्रयान 3 ची गती कमी करणार
इस्त्रोच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान 3 सध्या 38,520 किलोमीटर प्रति ताशी वेगाने चंद्राच्या दिशेने जात आहे. इस्त्रोचे वैज्ञानिक आता त्याचा वेग थोडा कमी-कमी करत जाणार आहेत. कारण जसे चंद्रयान 3 चंद्रापर्यंत पोहोचेल. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून 11 हजार किलोमीटर दूर, तिकडे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शुन्य होईल आणि चंद्राचे देखील शुन्य होईल. या परीस्थितीला L1 पॉईंट म्हणतात.
ADVERTISEMENT
चंद्राचे गुरूत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणापेक्षा 6 पट कमी असते. त्यामुळे चंद्रयान 3 ती गती देखील कमी करावी लागणार आहे. जर गती कमीच केली नाही तर तो चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकणार नाही आहे. आणि जर असे झालेच तर चंद्रयान 3.69 किलोमीटरवरून परत पृथ्वीच्या पाचव्या कक्षेच्या परीजीवर म्हणजे 230 तासास 236 किलोमीटर पुन्हा माघारी येईल. साधारण 10 दिवसात तो पृथ्वीवर परतणार आहे.
वेग 3600 किलोमीटर करावा लागेल
येत्या 5 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्टपर्यंत चंद्रयान 3 चा वेग कमी करावा लागणार आहे.चंद्राच्या गुरूत्वाकर्षणानुसार सध्या चंद्रयान 3 चा वेग खुपच जास्त आहेत. या वेगाला कमी करून 1 किलोमीटर प्रती सेकंदवर आणावा लागेल. म्हणजेच 3600 किलोमीटर प्रतितास. या वेगातच चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकणार आहे. आणि त्यानंतर गती कमी करून तो दक्षिण ध्रुवाजवळ त्याच्या लॅंडरला उतरवले जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT