Chandrayaan-3 Mission या 50 जणींमुळे यशस्वी, कोण आहेत या ‘रॉकेट वुमन’?
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्रोकडे लागले आहे. भारताला चांद्रयान-3 मिशन या मोहिमेकडून खूप आशा आहेत. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक महिला कार्यरत आहेत याबाबत तुम्हाला माहितीये का? या महिलांनी रात्रंदिवस मेहनत करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या सहभागाला आज संपूर्ण जग सलाम करत आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan-3 : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्रोकडे लागले आहे. भारताला चांद्रयान-3 मिशन या मोहिमेकडून खूप आशा आहेत. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक महिला कार्यरत आहेत याबद्दल तुम्हाला किती माहितीये? या महिलांनी रात्रंदिवस मेहनत करून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या सहभागाला आज संपूर्ण जग सलाम करत आहे. या मिशनमागे मोठ्या संख्येने महिलांचा हात असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. (Chandrayaan-3 Mission successful because of these 50 Rocket Women)
ADVERTISEMENT
Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
चांद्रयान-३ मोहिमेमागे महिलांचे मोठे योगदान!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, “चांद्रयान-3 मोहिमेत सुमारे 54 महिला अभियंता/शास्त्रज्ञ प्रत्यक्षपणे काम करत आहेत. त्या वेगवेगळ्या केंद्रांवर काम करत आहेत. त्या विविध प्रणालींसाठी सहयोगी आणि उपप्रकल्प संचालक आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणून आहेत.”
चांद्रयान-2 मध्ये दोन महिलांची महत्त्वाची भूमिका
चांद्रयान 2 या मोहिमेत दोन महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. ज्यात डायरेक्टर एम. वनिता आणि मिशन डायरेक्टर रितू क्रीडाल श्रीवास्तव होत्या. पण यावेळी चांद्रयान-3 मध्ये मिशन डायरेक्टरची जबाबदारी मोहन कुमार यांच्याकडे देण्यात आली आहे, तर व्हेईकल रॉकेट डायरेक्टर बिजू सी. थॉमस आणि स्पेसक्राफ्ट डायरेक्टर डॉ. पी. वीरमुथुवेल आहेत.
हे वाचलं का?
Kirit Somaiya: ‘BJP ने सोमय्यांचा बळी दिला’, आक्षेपार्ह Video वर सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य
चांद्रयान-3 चे यशस्वी लॉन्चिंग!
चांद्रयान-3 चे लॉन्चिंग श्रीहरिकोटा येथून 2:35 वाजता यशस्वीरित्या झाले. ज्याबद्दल प्रचंड उत्साह आहे. L110 स्टेजचे प्रोपेलेंट फिलिंग पूर्ण झाले आहे तर C25 स्टेजचे प्रोपेलेंट फिलिंग केले जात आहे. चांद्रयान-3 च्या प्रत्येक क्षणाचे अपडेट दिले जात आहे.
चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मोहिमांमध्ये सामान्य गोष्ट म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग आणि रोव्हरचे काही केमिकल एक्सपेरिमेंट करणे. तसंच, दोन्ही मोहिमांमधील लँडर स्पेसिफिकेशन, पेलोड एक्सपेरिमेंट आणि इतर गोष्टींमध्ये फरक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT