Cheetah Died: कुनो नेशनल पार्कमध्ये ‘सूरज’ चित्याचा मृत्यू कसा झाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

cheetah suraj death brought from namibia in national park of madhya pradesh
cheetah suraj death brought from namibia in national park of madhya pradesh
social share
google news

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) कुनो नेशनल पार्कमध्ये (kuno national park) शुक्रवारी नामिबियावरून आणलेल्या सूरज चित्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आतापर्यंत या नेशनल पार्कमध्ये 5 चित्ते आणि 3 शावकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आता चित्यांच्या मृत्यूंची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. सूरज हा आठवा चित्ता आहे ज्याचा कुनो नेशनल पार्कमध्ये मृत्यू झाला होता. आतापर्यंत सूरजच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही आहे. त्यामुळे आता मृत्युमागचं कारण शोधलं जात आहे. (cheetah suraj death brought from namibia in kuno national park of madhya pradesh)

कुनो नेशनल पार्कमध्ये 26 जूनला सूरज चित्याला जंगलात सोडण्यात आले होते. सुरज हा दहावा चित्ता होता, ज्याला जंगलात सोडले गेले होते. मात्र त्याचा आता मृत्यू झाला आहे.त्याच्या मृत्यूचे कारण आता शोधले जात आहे. याआधी साऊथ आफ्रिकावरून आणण्यात आलेल्या नर चित्ता तेजसचा 11 जुलै रोजी मृत्यू झाला होता. हा चित्ता कुनो नेशनल पार्कच्या व्यवस्थापणाच्या निरीक्षणा दरम्यान जखमी झाला होता. तेजसच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसत होत्या. या जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत कुनो नेशनल पार्कमध्ये 5 चित्ते आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Cabinet: खातेवाटप कोणाला ठरला लाभदायक?, कोणत्या मंत्र्याने कमावलं, कोणी गमावलं?

किती चित्ते आणले होते?

भारतात नामशेष झालेले चित्ते परत आणण्यासाठी नामिबिया आणि साऊथ आफ्रिकावरून 20 चित्यांना आणले गेले होते. मात्र विविध कारणांमुळे 5 चित्ते आणि 3 शावकांचा मृत्यू झाला होता. आता 15 प्रौढ चित्ते आणि 1 शावक निरोगी अवस्थेत आहेत. यामधील 12 चित्यांना जंगलात सोडून देण्यात आले होते. तर 4 चित्ते आणि 1 शावक सध्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किती चित्यांचा मृत्यू झाला?

आतापर्यंत 5 चित्यांसह 3 शावकांचा मृत्यू झाला आहे. कुनो नेशनल पार्कमध्ये नामिबिया आणि साऊथ आफ्रिकेतून 20 चित्ते आणले गेले होते. यामधील नामीबीयातून आणलेला मादी चित्ता ज्वालाने 4 शावकांना जन्म दिला होता. तर 26 मार्च 2023 रोजी नामीबियातून आणलेल्या मादा चिता साशाचा किडनीच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. तर नर चिता उदयचा 23 एप्रिल 2023 रोजी कार्डिओपल्मोनरी फेल्युरमुळे मृत्यू झाला होता.

यानंतर 9 मे 2023 रोजी नर चित्यांच्या हिंसक हस्तक्षेपामुळे दक्षाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 23 मेला नामिबियाची मादा चित्ता सियाया (ज्वालाच्या) 4 शावकांपैकी एकाचा मृत्यू झाला. यानंतर दोघांचा मृत्यू डिहायड्रेशनमुळे झाला होता. तसेच मंगळवारी 11 जुलैला आणखीण एक साऊथ आफ्रिकेचा चिता तेजसची मृत्यू झाला. मादा चिता नाभा सोबत हिंसत हस्तक्षेप करताना मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Cabinet Portfolio: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ… खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी एका क्लिकवर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चित्ता ‘सूरज’च्या मृत्यूवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आठव्या चित्ताच्या मृत्यूची बातमी मिळाली. चित्त्यांचा सतत मृत्यू होत असतानाही, आतापर्यंत अशी कोणतीही योजना पुढे आणली नाही, ज्यामध्ये जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. राजकीय प्रदर्शनवादासाठी वन्य प्राण्यांना आकर्षणाचा विषय बनवणे लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शोभत नाही. मी जबाबदार लोकांना विनंती करतो की त्यांनी पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांशी चर्चा करून लवकरच अशी योजना बनवावी, ज्यामुळे या जीवांचे प्राण वाचू शकतील,असे कमलनाथ म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT