Chhagan Bhujbal : 'सगेसोयऱ्यांचा तर्क असंवैधानिक, बेकायदेशीर...', भुजबळ स्पष्टच बोलले
Chhagan Bhujbal on Sage Soyare Manoj jarange Patil, Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळतंय, तेही केवळ एका जातीला... आणि इथे अनेक जातींना मिळून 17 टक्के आरक्षण आहे, तरीही ओबीसीत येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भुजबळ म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या

राज्यात फेक कुणबी प्रमाणपत्र बनवले जातायत

स्वतंत्र आरक्षण दिलंय मग कुणबी कशाला पाहिजे?
Chhagan Bhujbal on Sage Soyare Manoj jarange Patil, Maratha Reservation : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन सुद्धा त्याला (जरांगे) ओबीसीतून आरक्षण हवं आहे, त्याला आमचा सक्त विरोध आहे, अशी भूमिका राज्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. तसेच सगेसोयऱ्याचा तर्क, असंवैधानिक, बेकायदेशीर, अतार्कीक असून तो सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. (chhagan bhujbal on sage soyare manoj jarange patil cm eknath shinde maratha reservation special session)
मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यात 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पटलावर मांडले. या विधेयकाला विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजुरी मिळाली. या अधिवेशनानंतर भुजबळ यांनी पत्रकार परीषद देऊन आपली भूमिका मांडली.
हे ही वाचा : भाजपला सुप्रीम कोर्टाचा झटका! विनोद तावडेंची रणनीती फसली
मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसीत अगोदरच 54 टक्के समाज, 374 जाती आहेत. त्यात मराठा आल्यास कुणालाच काहीच मिळणार नाही, असे भुजबळ म्हणाले आहेत. तसेच मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळतंय, तेही केवळ एका जातीला... आणि इथे अनेक जातींना मिळून 17 टक्के आरक्षण आहे, तरीही ओबीसीत येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले. तसेच भुजबळांनी यावेळी राज्यात फेक कुणबी सर्टिफिकेट बनवले जात असल्याचा पुरावा देखील माध्यमांपुढे मांडला.