Chandigarh Mayor : भाजपला सुप्रीम कोर्टाचा झटका! विनोद तावडेंची रणनीती फसली
Chandigarh mayoral election Supreme Court : आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांना पक्षात घेऊनही भाजपला फायदा नाहीच.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चंदीगड महापौर निवडणूक
सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
चंदीगड भाजपला झटका
Chandigarh Mayor election Supreme court : (संजय शर्मा, दिल्ली) चंदीगड महापालिकेत आपला महापौर बसवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुप्रीम कोर्टाने जबर धक्का दिला. खाडाखोड करून बाद ठरवण्यात आलेल्या आठ मतांसह मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांना भाजपत घेण्याचा विनोद तावडे यांचा डावही फसला आहे. (Supreme court directs that, the votes at the poll shall be recounted and these 8 shall be treated as valid and results be declared on the basis of that)
ADVERTISEMENT
चंदीगड महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने आम आदमी पक्षाच्या 8 मतपत्रिकांवर फुल्या मारून ती बाद ठरवली. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने अनिल मसिह यांना चांगलेच झापले. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहे.
चंदीगड महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने आम आदमी पक्षाच्या 8 मतपत्रिकांवर फुल्या मारून ती बाद ठरवली. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने अनिल मसिह यांना चांगलेच झापले. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहे.
हे वाचलं का?
सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं?
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, "आम्ही निर्देश देतोय की, निवडणुकीत मतांची पुन्हा मतमोजणी करावी आणि यात जे आठ मते बाद ठरवण्यात आली होती, ती सुद्धा वैध धरण्यात यावी आणि त्याच आधारावर निकाल जाहीर करण्यात यावा."
सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टीची दखल घेतली की, जी 8 मते बाद ठरवण्यात आली होती, ती आम आदमी पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना टाकण्यात आली होती. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांची कानउघाडणी केली आहे.
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टामुळे भाजपला झटका
चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय भाजपसाठी मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. आठ मते बाद ठरवण्यात आल्याने भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जिंकून आला होता. पण, कोर्टाने ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत निवडणूक अधिकाऱ्याला हजर राहण्याचे आदेश दिले.
ADVERTISEMENT
दरम्यान, भाजपचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी कोर्टाच्या दुसऱ्या सुनावणी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने बाद ठरवण्यात आलेली 8 मतांसह मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यास सांगितले. त्यामुळे भाजपचे महापौर बसवण्याचे स्वप्न भंगले आहे.
विनोद तावडेंची खेळीही फसली
सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर यासंदर्भात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे म्हटले जात होते. याच दरम्यान भाजपने आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे महापालिकेतील बहुमत भाजपकडे गेलं. पण, सुप्रीम कोर्टाने पुर्नमतमोजणी करण्याचे निर्देश दिल्याने, तावडेंची ही खेळीही व्यर्थ ठरली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT