Irshalwadi Landslide : ‘भला मोठा कडाच…’, एकनाथ शिंदेंना इर्शाळवाडी काय दिसलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

After inspecting the Irshalwadi fissure accident, Chief Minister Eknath Shinde made a statement about this incident in the Legislative Assembly.
After inspecting the Irshalwadi fissure accident, Chief Minister Eknath Shinde made a statement about this incident in the Legislative Assembly.
social share
google news

Irshalwadi Landslide Latest news : इर्शाळगडाच्या कुशीत असलेली 50 घरांची इर्शाळवाडी उद्ध्वस्त झाली. अजूनही अनेकजण दरडीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त होत असून, शोध मोहीम सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. शोध मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केलं. इर्शाळवाडीवर झालेल्या आघाताची शिंदेंनी सर्व कहाणी सांगितली. त्याचबरोबर एक खंतही व्यक्त केली.

ADVERTISEMENT

इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात निवेदन केलं. ते म्हणाले, “19 जुलैला खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली. मोठी दुर्घटना घडली. रात्री (19 जुलै) 11.35 वाजता याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनं बचाव कार्यासाठी हालचाली केल्या. अतिशय दुर्गम भाग, वादळी वारा, पाऊस अशा स्थितीत रात्री 11.40 वाजता प्रशासकीय यंत्रणा तिथे पोहोचली. मी त्यांच्या संपर्कात होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्कात होते, तर अजित पवारही नियंत्रण कक्षात होते.”

वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!

– “तत्काळ बचाव कार्य करण्यासाठी यशवंती हायकर्स संस्थेचे 25 स्वयंसेवक आणि चौकमधील 30 ग्रामस्थ, वरोशाचे 20 ग्रामस्थ आणि खोपोली नगरपालिकेचे कर्मचारी, कोलाडचे रिव्हर फायटर्स असे सगळे लोक तातडीने तिथे पोहोचले. एनडीआरएफच्या चार टीम पोहोचल्या. टीडीआरएफचे 100 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या पाच टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली.”

हे वाचलं का?

इर्शाळवाडी डोंगर कपारीत

– “घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात होतो. आमदार महेश बालदींनी मला फोन केला होता. मी गिरीश महाजनांना फोन केला. उदय सामंत, दादा भुसे हे रात्री तीन वाजता जिथे घटना घडली तिथे होते. डोंगराच्या कपारीत हे गाव वसलेले आहे.”

’17 ते 18 घरांवर तो पूर्ण कडा कोसळलेला होता’

– “त्यांना बाहेर काढणं ही महत्त्वाची कामगिरी होती. इतर वेळी मशिनरी लागते. जेसीबी लागतात, पोकलेन लागतात. पण, तिथे तशी परिस्थितीच नव्हती. 50 ते 100 वर्षांपासून राहणारे रहिवाशी होते. ते क्षेत्र दरड प्रवण यादीतही नव्हतं. या सगळ्या परिस्थितीत मागच्या बाजूला असलेल्या इर्शाळगडाचा मोठा डोंगरच कोसळला. सुरुवातीला आम्हाला अशी माहिती मिळाली होती की, तो अख्खा डोंगरच त्या घरांवर पडला आहे. पण, त्याठिकाणी अधिकारी पोहोचल्यानंतर तिथे 17 ते 18 घरांवर पूर्णपणे तो कडा कोसळलेला होता.”

ADVERTISEMENT

वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!

– “इर्शाळगडाच्या पायथ्याशी आपण सगळी व्यवस्था केली होती. पण, वरती स्वतः बचाव कार्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून जास्तीत जास्त लोकांना तिथे पाठवलं. मलबा हटवण्यासाठी फावडे, टिकाव, घमेल्यांच्या मदतीने हे काम सुरू होतं. त्यानंतर सिडकोनेही आणखी माणसं पाठवली.”

ADVERTISEMENT

दोन चॉपर तैनात होते, पण…

– “अमित शाहांचा फोन आला होता. त्यांनीही काही मदत लागल्यास सांगा, अशी विचारणा केली. त्यांनी लष्काराचे दोन चॉपर तैनात ठेवले होते. त्यामुळे आम्ही विचार केला की, त्याद्वारे दोन छोट्या (जेसीबी) मशिन हेलिकॉप्टरच्या मदतीने घटनास्थळी सोडू शकतो का? तोही प्रयत्न केला पण वातावरण खराब होतं.”

– “पाऊस होता. वारा होता. दृश्यमानता नव्हती. त्यामुळे त्या प्रयत्नांना काही यश आलं नाही. सुदैवाने तिथल्या आश्रम शाळेत काही मुलं खेळत होती. त्यांना आवाज आल्यानं त्यांनी खाली येऊन लोकांना सांगितलं. काही लोक मासेमारी, काही भातशेतीसाठी गेले आहेत. पंरतु कालपासून (19 जुलै) 20 जणांचे मृत्यू झालेला आहे. 8 लोक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”

‘अतिशय विदारक… भयानक दृश्य’

– “नातेवाईकांचा आक्रोश आणि मृतांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणं, हे देखील जिकिरीचं काम होतं. एकीकडे काही लोक मलबा हटवण्याचं काम करत होते. दुसरीकडे त्या मृतांच्या नातेवाईकांशी बोलून वरतीच विधी करायचा ठरला. खड्डे खोदत होते. अतिशय विदारक… अतिशय भयानक दृश्य होतं. भीषण आणि दुर्दैवी घटना ती होती.”

वाचा >> ‘अजित पवारांना आरएसएस, नितीन गडकरी गटाचा विरोध’, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली सगळी स्टोरी

– “सगळ्यांनी माणुसकी दाखवली. अनेकजण शोध मोहीम करणाऱ्या जवानांसाठी पाणी, बिस्किटं घेऊन जात होते. मृतांच्या नातेवाईकांना खाली आणलं. त्यांना एका ठिकाणी शाळेत ठेवलं. शाळेत व्यवस्था केली. एनडीआरएफची खूप मदत झाली. पण, अख्खा डोंगरच त्या 17-18 घरांवर कोसळला. आता त्यावेळी काहीजण घराच्या बाहेर होते. त्यामुळे आपण परेश्वराकडे प्रार्थना करूयात की, तो जो बाहेर असलेल्यांचा आकडा आहे, तो जास्त असावा.”

– “20 लोकांचा मृत्यू झाला असून, शासन म्हणून जे आपल्या हातात आहे, ते आपण केलं. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली. जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही संपर्कात होते. आपल्याकडे यंत्रणा होती, पण आपण ती वापरू शकत नव्हतो.”

‘एका जवानाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू’

– “आज (21 जुलै) सकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. गिरीश महाजन आणि महेश बालंदीचं कौतुक करायला हवं. कारण तिथे त्यांना धीर देणं गरजेचं होतं. तिथे चढ आहे. मी सुरूवात केली, पण एका टप्प्यावर जाऊन मला दम लागल्यासारखं वाटलं. फार उंचावर ते होतं. फार भयंकर ती परिस्थिती होती. तिथे पोहोचल्यानंतर मी विचार केला की, जे साहित्य घेऊन जाताहेत त्यांना सॅल्यूट केला पाहिजे. कारण प्रसंग बाका होता आणि परिस्थिती कठीण होती. अग्निशामक दलाचा जवान बचाव कार्यासाठी जात होता. त्याने प्रयत्न केले, पण ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.”

वाचा >> Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह Video, आव्हाडांच्या मुलीचं ‘ते’ ट्वीट प्रचंड चर्चेत

– “तिथल्या लोकांचा आक्रोश पाहिला. हा दुर्दैवी प्रसंग होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असताना आपण वापरू शकलो नाही, ही मनामध्ये खंत आहे. तिथे काम सुरूच आहेत. अशा स्वरुपाच्या घटनांमध्ये काही वेळा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीही लोक जिवंत मिळालेली आहेत. तेवढीच आपण प्रार्थना करू शकतो.”

– “या लोकांची तातडीने व्यवस्था शाळेत केलीये, पण 60 कंटेनर मागवले आहेत. ती जी कुटुंब आहेत, ती त्या कंटनेरमध्ये टॉयलेट, बाथरुम या सगळ्यांची सोय करण्यात आलेली आहे. आपण जोपर्यंत त्यांचं कायमस्वरूप पुनर्वसन करत नाही, तोपर्यंत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतंत्र कंटेनर दिले आहेत.”

सिडको देणार घरं बांधून

– “त्यांच्या पुनर्वसनासाठी एक जागा बघितली आहे. सिडकोचे व्यवस्थापक डिग्गीकरांना सांगितलं आहे की, जागा दिल्याबरोबर घरं बांधून त्यांना कायम स्वरूपी देणार आहोत. तत्काळ ती घरं बांधली जाईल. सिडकोकडे मोठ्या कंपन्या असल्यामुळे ते तातडीने करता येईल. त्याचबरोबर अशा घटना टाळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत दरड प्रवण क्षेत्रातील काही लोक आग्रहाने तिथेच राहतात. पण, ज्या ठिकाणी खरंच धोका आहे, तिथल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्याचा आराखडा करण्यावर चर्चा झाली. राज्यात ज्या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवणार आहोत. मृतांना आपण श्रद्धांजली वाहुयात. शासन या दुर्घटनांग्रस्तांच्या पाठिशी आहे.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT