Viral News: ...म्हणून Colleague ने HR कडे केली नवऱ्या मुलीची तक्रार, कारण समजलं तुम्हीही म्हणाल बाईईई काय हा प्रकार!
एका महिलेने तिच्या ऑफिसमधील महिला सहकाऱ्याला तिच्या लग्नात आमंत्रित केलं नाही. याच गोष्टीमुळे संबंधित महिला सहकाऱ्याला राग आला आणि त्याने होणाऱ्या वधूबद्दल एचआर टीमकडे तक्रार केली.

बातम्या हायलाइट

लग्नाला बोलवलं नाही म्हणून केली HR कडे तक्रार

महिलेने व्हिडीओ शेअर करत सांगितली घटना..
Viral Story: एका महिलेने तिच्या ऑफिसमधील महिला सहकाऱ्याला तिच्या लग्नात आमंत्रित केलं नाही. याच गोष्टीमुळे संबंधित महिला सहकाऱ्याला राग आला आणि त्याने होणाऱ्या वधूबद्दल एचआर टीमकडे तक्रार केली. यानंतर, लग्नाला काही दिवस बाकी असताना एचआर टीमने त्या महिलेला बोलावले आणि तिच्या अशा वागण्याबद्दल चौकशी सुरू केली.
नेमकं प्रकरण काय?
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, एका महिलेने नुकतंच रेडिटवर तिच्या एका महिला सहकाऱ्याच्या विचित्र वागण्याबद्दल पोस्ट केली. त्यानंतर ही पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे. महिलेने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या लग्नाच्या आधी मला माझ्या ऑफिसच्या एचआर टीमकडून फोन आला आणि माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं." त्या महिलेने सांगितले की "माझ्यासोबत काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याने मी माझ्या लग्नाला तिला आमंत्रित न केल्याबद्दल एचआरकडे तक्रार केली. यामुळे तिला अपमानित आणि दुर्लक्षित वाटलं. तसेच, तिने माझ्यावर ऑफिसमध्ये शत्रुत्वाचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला आणि थेट ऑफिसच्या एचआर टीमकडे तक्रार केली."
व्हिडीओमध्ये महिला काय म्हणाली?
महिला सहकाऱ्याने केलेल्या तक्रारीवर संबंधित महिला म्हणाली, "हा खरोखर विचित्रपणा आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी आहे जिच्याशी मी मैत्री केली पण आमचा फार जवळचा संबंध नाही. आम्ही ऑफिसमधल्या छोट्या लहान सहान गोष्टींबद्दल बोलतो. इतकेच नव्हे तर ऑफिसमध्ये आम्ही कधी एकत्र जेवणही केलं नाही. कामाव्यतिरिक्त आमच्यात काही खास नातं नाही. तिला मी लग्न करत असल्याचं आणि तिने मला विचारलं की तुझं लग्न कधी आहे? त्यानंतर तिने थेट विचारलं की तिला लग्नाचं आमंत्रण मिळेल का?"
हे ही वाचा: टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण अन् मृतदेह...
लग्नाला आमंत्रित केलं नाही म्हणून थेट तक्रार
"यानंतर ती शांत झाली, त्यामुळे मला वाटलं सगळं ठीक आहे. पण माझ्या लग्नाला काहीच दिवस बाकी असताना मला ऑफिसच्या एचआरने भेटण्यासाठी बोलावलं. एचआरकडे गेल्यानंतर मला कळले की माझ्या महिला सहकाऱ्याने मी तिच्याशी योग्य पद्धतीने वागत नसल्याची माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या लग्न समारंभापासून ऑफिसमधील एका सहकाऱ्याला दूर ठेवून मी ऑफिसमध्ये प्रतिकूल वातावरण निर्माण करत असल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला."
यानंतर पीडितेने रेडिटवर पुढे लिहिले की "एचआरकडून माझी तक्रार ऐकून मला खूप वाईट वाटलं. मग मी एचआर टीमला समजावून सांगितले की माझ्या लग्नाला माझ्या सर्वच ओळखीच्या सहकाऱ्यांना आमंत्रित करण्याची मला गरज नाही वाटली. माझ्यासाठी हा एक खाजगी कार्यक्रम असून त्याचा माझ्या कामाशी किंवा ऑफिसशी काहीही संबंध नाही."
हे ही वाचा: आता काय खरं नाय! सोनं तर महागलंच..पण चांदीची चमकही वाढली, सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
पुढे महिलेने असं सुद्धा लिहिलं की "एचआर टीमने माझ्याशी सहमती दर्शवली आणि प्रकरण तिथेच थांबवलं. पण, माझी सहकारी माझ्यावर अत्यंत रागावली आहे."