Train Accident: एक्सप्रेस-मालगाडीची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 280 जणांचा मृत्यू; 900 जखमी
coromondel expres: ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीच्या झालेल्या भीषण अपघातात तब्बल 30 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 179 जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
Breaking news today in Marathi: बालासोर (ओडिशा): ओडिशातील बालासोर येथे आज (2 जून) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला. मिळालेल्या माहितीनुसार बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (12841) आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या भयंकर अपघातात तब्बल 280 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. याशिवाय तब्बल 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धडक एवढी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली. ज्यानंतर मालगाडीचे अनेक डबे ट्रेनच्या वरच्या भागावर गेले. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडलचे सात डबे रुळावरून घसरले आहेत.
ADVERTISEMENT
10 प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या 132 प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेसही घटनास्थळी पाठविण्यात येत आहे.
हे वाचलं का?
विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय ट्रॅक साफ करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. डीजीपी अग्निशमन सेवा डॉ. सुधांशू सारंगी हेही मुख्यालयातून अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार बचावकार्यासाठी जनरेटर आणि दिव्यांची व्यवस्थाही करत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री प्रमिला मल्लिक आणि विशेष मदत आयुक्तांना तातडीने अपघातस्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT
हेल्पलाइन क्रमांक
आपत्कालीन नियंत्रण कक्ष: 6782262286
ADVERTISEMENT
– हावडा: ०३३-२६३८२२१७
– खरगपूर: 8972073925, 9332392339
– बालासोर: 8249591559, 7978418322
– कोलकाता शालीमार: 9903370746
– रेल्वे मदत: 044- 2535 4771
– चेन्नई सेंट्रल रेल्वे: 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771
5 गाड्या रद्द तर 5 ट्रेनचे मार्ग बदलले
या भीषण अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. रेल्वेने या मार्गावरील सहा गाड्या रद्द केल्या आहेत, तर पाच गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. पुरी एक्सप्रेस 12837, यशवंतपूर एक्सप्रेस 12863, संतरागाछी पुरी स्पेशल 02837, शालीमार संबलपूर 20831, चेन्नई मेल 12839 या रद्द करण्यात आल्या आहेत.
ममता बॅनर्जींचं ट्विट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली. ‘हे जाणून धक्का बसला… पश्चिम बंगालहून प्रवाशांना घेऊन जाणारी शालीमार-कोरोमंडल एक्स्प्रेस आज संध्याकाळी बालासोरजवळ मालगाडीला धडकली. ज्यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले.’
‘आमच्या लोकांच्या भल्यासाठी आम्ही ओडिशा सरकार आणि दक्षिण पूर्व रेल्वेशी समन्वय साधत आहोत. आमचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष 033- 22143526/22535185 या क्रमांकाने त्वरित कार्यान्वित करण्यात आले आहे. बचाव आणि मदतीसाठी सर्व प्रयत्न सुरू झाले आहेत.’
‘ओडिशा सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी आम्ही 5-6 सदस्यांची टीम घटनास्थळी पाठवत आहोत. मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.’
नेमका अपघात कशामुळे झाला?
प्राथमिक माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीवर चढले, यावरून रेल्वेचा वेग खूपच जास्त असल्याचे दिसून येते. रेल्वे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्या होत्या. आता यात कोणाची चूक आहे, याचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT