Odisha Train Accident: स्वस्त झालंय मरण, एका झटक्यात 280 जण ठार; नेमका कसा झाला अपघात?
Marathi Latest News: ओडिशात झालेल्या भीषण ट्रेन अपघातात तब्बल 280 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. तब्बल तीन ट्रेनच्या या अपघाताने शेकडो जणांचे जीव घेतले आहेत.
ADVERTISEMENT

Marathi Latest News: बालासोर (ओडिशा): ओडिशातील (Odisha) बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनजवळ घडलेला अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. अपघाताचे वृत्त शुक्रवारी रात्री टप्प्याने-टप्प्याने समोर आलं. सुरुवातीला कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromondel Expres) आणि मालगाडी (Goods Train) यांच्यात धडक झाल्याचं वृत्त समोर आलेलं. यानंतर हावडा एक्स्प्रेसच्या (Howrah Express) धडकेचीही बातमी आली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तीन गाड्यांमध्ये धडक झाल्याचे स्पष्ट झालं. या अपघाताचे आतापर्यंत जे फोटो समोर आले आहेत, ते अत्यंत भयावह आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा हा 30, नंतर 50, नंतर ७० असा वाढत होता. मात्र, आता मृतांचा आकडा हा 280 देखील (280 Death)पुढे गेला आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता किती आहे याचा आपल्याला अंदाज लावता येईल. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ही माहिती दिली. (coromondel express goods train howrah express triple train accident odisha 280 deaths 900 injured)
लष्कराकडून मदत कार्य सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर जो रेल्वे डब्ब्यांचा जो ढिगारा झाला त्यात अजूनही अनेक मृतदेह असल्याचं समजतं आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक एसी डबे हे बाजूच्या रुळावर उलटले होते त्यामुळे त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. डब्ब्यांमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागत आहे. बचावकार्यात लष्करानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केला एक दिवसाचा राजकीय दुखवटा
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार 3 जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा केला जाणार नाही. ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.
अशी होती अपघाताची परिस्थिती
अपघाताबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 12841 (कोरोमंडल एक्स्प्रेस) चे डबे B2 ते B9 चे डबे घसरले. त्याचवेळी A1-A2 चे डबेही रुळावरून घसरले. तर कोच B1 तसेच इंजिन रुळावरून घसरले आणि शेवटी H1 आणि GS कोच हे रुळावरच राहिले. म्हणजेच, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या जास्त असू शकते आणि एसी बोगीमध्ये बसलेल्या लोकांची जीवितहानी अधिक होण्याची शक्यता आहे.