महाराष्ट्रात आढळला JN1 कोरोनाचा रुग्ण, आरोग्य यंत्रणेकडून अलर्ट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

corona jn1 variant case confirmed maharashtra sindhudurg health minister advised to not to panic
corona jn1 variant case confirmed maharashtra sindhudurg health minister advised to not to panic
social share
google news

JN.1 Variant Case In Maharashtra : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन1’चा (JN.1 Variant) पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. केरळ पाठोपाठ आता गोवा आणि महाराष्ट्रातही या व्हेरियंटचा पहिला रूग्ण आढळला आहे. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात ‘जेएन1’चा पहिला रुग्ण आढळलाय. हा रूग्ण 41 वर्षाचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. (corona jn1 variant case confirmed maharashtra sindhudurg health minister advised to not to panic

ADVERTISEMENT

देशात पहिल्यांदा केरळच्या थिरूवअनंतपुरममधील काराकुलम येथे 8 डिसेंबरला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन1’चा पहिला रुग्ण आढळला होता. हा रूग्ण 79 वर्षाची एक महिला होती. ही महिला आता पूर्णपणे बरे झाली आहे. यानंतर याच ‘जेएन1′ ची प्रकरणे आता महाराष्ट्र आणि गोव्यात आढळली आहेत. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गात आढळलेला हा व्यक्ती 41 वर्षाचा पुरुष आहे. हा रूग्ण देखील बरा होऊन घरी आला आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. दरम्यान हा नवीन प्रकार आल्यानंतर आरोग्य विभागाला जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा : Mla Disqualification: फडणवीस-पवारांचा पहाटेचा शपथविधी शिंदेना भोवणार? ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत

आरोग्यमंत्री काय म्हणाले?

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार जेएन1 या नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. याबाबत काही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेऊन औषध घ्यावीत.कोविडशी संबंधित सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील नागरीकांना केले आहे.

हे वाचलं का?

देशातील जेएन.1 चे पहिले प्रकरण केरळमध्ये नोंदवले गेले. चीन आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये हा प्रकार वाढत आहे. अमेरिकेत सप्टेंबरमध्ये पहिली केस नोंदवली गेली. त्याच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर, पोटदुखीसह ताप, सर्दी आणि घसा खवखवणे आहे.दुसरीकडे, कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारकडून राज्यांना एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली असून त्यांना चाचणी वाढवून आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : ‘…तर जेलमध्ये जाल, मॉब लिंचिंग करणाऱ्यांना थेट फाशीच’, अमित शहांची मोठी घोषणा

देशात कोरोनाचे 2,669 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण

आज गुरूवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 358 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोविडच्या JN.1 या उप-प्रकारामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,669 वर पोहोचली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT