Deer Viral Video : गवत खाऊन कंटाळला! शाकाहारी हरणाचा विषारी सापावर ताव
व्हायरल व्हिडिओत नेहमी गवत खाणारा हरीण (Deer) पहिल्यांदाच विषारी साप घाताना दिसला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले असून भन्नाट कमेंट करत आहेत. हरीण (Deer video) म्हटला तर शाकाहारी प्राणी, जो जंगलातील गवत, झाडांची पाने खाऊन स्वत:चे पोट भरतो. मात्र पहिल्यांदाच एक हरीण मांसाहार करताना दिसला आहे.
ADVERTISEMENT
Deer Eating Snake Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडिओ असे देखील असतात, जे पाहून आपल्यालाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहमी गवत खाणारा हरीण (Deer) पहिल्यांदाच विषारी साप घाताना दिसला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले असून भन्नाट कमेंट करत आहेत. (deer eating snake video viral on social media people crazy comments and like)
ADVERTISEMENT
हरीण (Deer video) म्हटला तर शाकाहारी प्राणी, जो जंगलातील गवत, झाडांची पाने खाऊन स्वत:चे पोट भरतो. मात्र पहिल्यांदाच एक हरीण मांसाहार करताना दिसला आहे. या हरणाने चक्क विषारी साप चावून खाल्ला आहे. मात्र यावर कोणालाही विश्वास बसत नाही आहे. कारण हरीण नेहमी गवत, झाडांची पाने खाताना दिसला आहे, त्यामुळे अशी अचानक हरणाची टेस्ट बदलल्याने नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत.
हे ही वाचा : मुंबईजवळून जाणाऱ्या Biporjoy ने चुकवला काळजाचा ठोका, ऐनवेळी दिशाच बदलली..
व्हायरल व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत, तुम्ही पाहू शकता, एक हरीण दिसत आहे. हा हरीण साप चावुन खाताना दिसत आहे. हरीण नेहमी गवत,झाडाची पाने, फुले खाताना दिसला आहे. मात्र प्रथमच हरणाने सापाला खाल्ले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सापाने हरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे थेट हरणाने सापावर हल्ला करत त्याचा शिकार केला आहे. या शिकारीचा व्हिड़िओ असावा असा अंदाज बांधण्यात आला आहे.
हे वाचलं का?
Deer eating Snake 🐍 🦌 pic.twitter.com/GEqrcF0B7v
— Levandov (@blabla112345) June 11, 2023
घटनास्थळावरून जात असलेल्या एका कार चालकाने हा संपूर्ण व्हिडिओ त्याच्या कॅमेरात कैद केला आहे. Levandov नावाच्या एका ट्वीटर हॅंडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर आता नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. एका य़ुझरने लिहले की, घोर कलयुग आहे, शाकाहारी मांसाहारी बनले आहेत. दुसऱ्या एका युझरने लिहले की, सोयाबीन समजून खाल्ले असेल. तर तिसऱ्या युझरने लिहले की, वेळ बदलतोय, तशा सवयीही बदलत आहेत. आणखीण एका युझरने लिहले की, हरीण भाई बी लाईक, सापाला गवत समजून खाल्ल, जसा माणूस चिकनला पनीर समजून खातो.
ADVERTISEMENT
दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर 1.1 मिलियन व्युस आले आहेत. तर 1 हजारहून अधिक लाईक आले आहे.या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चॉकलेट समजून सापालाच खाल्लं, नंतर 3 वर्षाच्या चिमुकल्याला…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT