सरन्यायाधीशांच्या संतापाचा कडेलोट, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश

मुंबई तक

देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची जोरदार तयारी करत आहेत. तर दुसरीकडे चंडीगड महापौर निवडणुकीचे आयोजन करणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यावर मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून ताशेरे ओढले गेले आहेत. या निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Democracy was killed in Chandigarh mayor election Chief Justice D Y Chandrachud's serious comment
Democracy was killed in Chandigarh mayor election Chief Justice D Y Chandrachud's serious comment
social share
google news

Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice D. Y. Chandrachud) यांच्या नेतृत्वाखाली 3 न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी केली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी पीठासीन कार्यालयाचा व्हिडीओही (Video) पाहिला आहे. त्यामध्येमध्ये ते मतं रद्द करत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर बोलताना त्यांनी ही लोकशाहीची थट्टा असल्याचा ठपका सरन्यायाधीशांनी ठेवला आहे.

जो प्रकार घडला आहे, ते पाहून आम्ही हादरलो असल्याचेह त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही ही लोकशाहीची अशा प्रकारे हत्या होऊ देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. यावेळी सरन्यायाधीशांनी निवडणुकीचा संपूर्ण व्हिडिओही सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेकॉर्ड देण्याच्या सूचना

चंदीगड महापौर निवडणुकीला आव्हान देणाऱ्या आप आणि काँग्रेसचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे ही सर्व कागदपत्रे आणि सर्व व्हिडिओ पुराव्यांसह संपूर्ण रेकॉर्ड संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’

हे ही वाचा >> Lok Sabha : PM मोदींचा जोरदार हल्लाबोल, ‘घराणेशाहीमुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळं…’

कामकाज तूर्तास स्थगित

या सगळ्या प्रकारामुळे चंदीगड महापालिकेची 7 फेब्रुवारी रोजी होणारी पहिली सभा अनिश्चित काळासाठी स्थगितही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नव्या महापौरांचे कामकाज तूर्तास तरी स्थगित ठेवण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp