दारुची पैज जीवावर बेतली!, 2 लाख कमवण्याच्या नादात धक्कादायक अंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

drinking contest bet goes to Life shocking end earn 2 lakhs
drinking contest bet goes to Life shocking end earn 2 lakhs
social share
google news

Viral Story: लोकं अनेकदा एखादी पैज (bet) जिंकण्यासाठी, कधी कधी नको त्या गोष्टी करुन बसतात. त्यांच्या त्या मुर्खपणामुळेच मग त्याचा मोठा तोटा सहन करावा लागतो. तर कधी त्या सगळ्यात कधी तरी जीवही जाऊ शकतो. असाच प्रकार चीनमधील एका व्यक्तीबाबत घडलं आहे. 2 लाख (2 lakhs) रुपयांची पैज जिंकण्याच्या प्रयत्नात चीनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू ( Life shocking end)  झाला आहे. त्या व्यक्तीने सगळ्यात जास्त दारु पिण्याची पैज लावली होती. कारण त्या स्पर्धेत त्याला 2 लाख रुपयेही मिळणार होते.

ADVERTISEMENT

बॉसने लावली पैज

चीनमध्ये घडलेल्या या घटनेचा वृत्तांत देताना एका माध्यमसंस्थेने मृत झँग हा ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेनमधील एका कंपनीत नोकरीला होता. त्यावेळी त्याने कंपनीतील एका पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या बॉसने दारु पिण्याची पैज लावली. ती पैज होती 2.28 लाख रुपयांची. दारु पिण्याची पैज जिंकली तर झांग यांना दोन लाखापेक्षा जास्त रुपये मिळणार होते.

हे ही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप

दारुसाठी लाखाचे बक्षीस

बॉसने दिलेल्या पार्टीत सांगितले की जो कोणी जास्त दारु घेईल त्याला 2.28 लाखाचे बक्षीस दिले जाईल. ती पैज जिंकण्यासाठी मग झँगने दारुचे पेगवर पेग घेतले होते. त्यामध्ये झांगला सांगण्यात आले की, ही पैज तू जिंकलास तर 2.28 लाख रुपये तुला मिळतील. मात्र जर पैज हरला तर मात्र दीड लाखाची चहाची पार्टी कंपनीला तुला द्यावी लागले. त्यामुळे ही पैज जिंकण्यासाठी दारु घ्यायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

10 मिनिटात खेळ खल्लास

यानंतर यांगने झँगबरोबर ही पैज लावण्यासाठी त्याच्या ड्रायव्हरसह अनेक कर्मचाऱ्यांची त्याने निवड केली. दारु पिण्याच्या पैज लावल्यानंतर त्यातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ही पैज जिंकण्यासाठी झँगने 10 मिनिटांत सुमारे एक लिटर चायनीज बैज्यू दारु घेतली आहे. मात्र त्यानंतर तात्काळ झँगला त्याचा त्रास सुरु झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मात्र डॉक्टरांना त्याला न्यूमिनिया झाल्याचे सांगितले. मात्र त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >> Maharashtra Politics: अजित पवार की एकनाथ शिंदे… भाजपला कोण ठरतंय डोकेदुखी?

कंपनीला टाळे

दारु पिण्याची पैज लावल्याचे लक्षात येताच दुसऱ्या दिवसांपासून ती कंपनीच बंद करण्यात आली. या प्रकारात कंपनी प्रशासनाला जबाबदार धरण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. झँगने दारुचे अतिसेवन केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT