Goregaon: बिबट्या पोहोचला मुंबई फिल्म सिटीत! शुटिंग सुरू असतानाच एन्ट्री, नंतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

During the shooting of the serial a leopard entered in Mumbai Film City people
During the shooting of the serial a leopard entered in Mumbai Film City people
social share
google news

Mumbai : मुंबईतील फिल्म सिटी भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी अचानक बिबट्या घुसला. त्यानंतर त्याने तेथील एका कुत्र्यावर हल्ला केला. ज्यानंतर कुत्र्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने ही माहिती अखिल भारतीय सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांना दिली. (During the shooting of the serial a leopard entered in Mumbai Film City people were shocked)

ADVERTISEMENT

वाचा : आताच्या घडीची मोठी बातमी.. अजित पवार गटाचे आमदार थेट शरद पवारांच्या भेटीला, पुन्हा भूकंप?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोरेगाव येथील फिल्मसिटी भागातील आहे. मालिकेच्या सेटवर बिबट्या आला तेव्हा तिथे 300 लोक उपस्थित होते. यावेळी बिबट्या कोणावरही हल्ला करू शकत होता. पण, त्याला कसंबसं त्याठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं.

एआयसीडब्ल्यूए अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले की, ‘ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. हे मुद्दे त्यांनी अनेकदा मांडले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला आहे.’

हे वाचलं का?

वाचा : ‘महिनाभर थांबा, तुम्ही पण भाजपत येणार’, विधानसभेत गिरीश महाजनांचा नवा बॉम्ब

अशाप्रकारचे हल्ले वारंवार होत आहेत. मात्र आजपर्यंत सरकारकडून ठोस पाऊलं उचलण्यात आलेली नाहीत. संपूर्ण फिल्मसिटीमध्ये बिबट्याची दहशत आहे. कलाकार, मजूर सगळेच भीतीच्या छायेत जगतात.

याआधी यूपीमधील गाझियाबादमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. गाझियाबाद कोर्टात अचानक एक बिबट्या घुसला होता. यानंतर तिथे मोठी खळबळ उडाली. त्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT