‘आता हे सहन होत नाहीये’, मेधा कुलकर्णींचा संयम संपला, चंद्रकांत पाटलांसह भाजपला सुनावलं
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांना सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
Pune political news : ज्यांनी चंद्रकांत पाटलांसाठी आपला विधानसभा मतदारसंघ सोडला, त्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आठवतच असतील. चंद्रकांत पाटील सध्या ज्या कोथरुड मतदारसंघाचे आमदार आहे, तो आधी मेधा कुलकर्णींकडे होता. मेधा कुलकर्णींनी मतदारसंघ सोडला, पण त्यांना डावललं जात असल्याची स्थिती आहे. आता यावर मेधा कुलकर्णींच्याच पोस्ट शिक्कामोर्तब केलंय. त्यांनी एक जळजळीत पोस्ट लिहून चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिलीये. या पोस्टमध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केलेला नसला, तरी त्यांचा बोलण्याचा रोख त्यांच्याच दिशेने आहे. इतकंच नाही, तर त्यांनी व्हिडीओ आणि इतर काही गोष्टीही शेअर केल्या आहेत. ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे’, या मथळ्याखाली मेधा कुलकर्णींनी पोस्ट लिहिली आहे.
मेधा कुलकर्णींची फेसबुक पोस्ट
“माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही, पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी… चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.”
हे वाचलं का?
वाचा >> Manipur Violence: ‘मणिपूर जळतंय अन् मोदी हास्य-विनोद…’, राहुल गांधींनी चढवला हल्ला
“चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, ‘तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला.”
“अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ याविषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सदय नेते… माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?”
वाचा >> ‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?
“मध्यंतरी आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहजी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडळ अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.”
ADVERTISEMENT
“गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरिष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.”
ADVERTISEMENT
“माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT