शिवसेनेचे दोन आमदार भिडले, दौरा अर्ध्यावर सोडून एकनाथ शिंदे मुंबईत

मुंबई तक

ADVERTISEMENT

two shiv sena MLAs Fight over claiming ministerialship in eknath shinde cabinet.
two shiv sena MLAs Fight over claiming ministerialship in eknath shinde cabinet.
social share
google news

Eknath Shinde Shiv sena : अजित पवार यांच्या एन्ट्रीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडलीये. पण, आता ही अस्वस्थता पक्षात वाढत असल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी सरकारमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेनेतील अनेकांची संधी हुकणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्यातूनच सेनेच्या दोन आमदारांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली आहे.

‘लोकसत्ता’ दैनिकाने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. सत्ता येऊन वर्ष झालं तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा असतानाच अजित पवार गट युतीत सामील झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या सेनेची नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या दोन आमदारांमध्ये झटापट

अजित पवारांचा गट युतीत आल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिमंडळातील जागा घटणार आहे. भरत गोगावले यांनीच हे स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंसोबत बंड करणारे अनेक आमदार मंत्रिपदाकडे वर्षभरापासून डोळे लावून बसले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> शरद पवारांनी अजित पवारांना सांगितलं भाजप आणि शिवसेनेचं हिंदुत्व कसं वेगळं?

अजित पवार गटाच्या रुपाने सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने शिवसेनेतील इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याचीच दाट चिन्ह आहेत. त्यात आपली मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून शिंदेंच्या गटातील आमदार प्रयत्न करताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कमी जागा वाट्याला येणार असल्याने वर्षभरापूर्वी मंत्री झालेल्यांना बाजूला करून इतरांना संधी द्या अशी मागणी आता शिंदेंकडे त्यांच्या आमदारांकडून होत आहे.

वाचा >> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story

दरम्यान, मंत्रिपदावर दावा करत असलेल्या दोन आमदारांमध्ये 4 जुलै (मंगळवारी) बाचाबाची झाली. दोन्ही आमदारांमधील वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही आमदारांनी एकमेकांना मारहाण केली, असं सुत्रांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंना दौरा सोडावा लागला अर्ध्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. आमदारांमध्ये झालेल्या वादानंतर ही बैठक घेण्यात आली, अशी माहिती आहे. आमदारांमधील वाद मिटवण्यासाठी आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदेंना नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईत परतावं लागलं. बुधवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत दोन्ही आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते, असंही सुत्रांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT