Budget 2024 : मोबाईल, चार्जर होणार स्वस्त! अर्थसंकल्पात काय केली घोषणा?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करण्यात आल्या?

point

अर्थसंकल्पातील 'या' बदलांचा कसा होणार परिणाम? 

point

कोणत्या दूरसंचार उपकरणांवर कस्टम ड्युटी वाढली?

Budget 2024 Announcement : मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (23 जुलै 2024) सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये मोबाईल संदर्भातही एक महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा करण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षात भारतात मोबाईलच्या उत्पादनात झपाट्याने वाढ झाली आहे. (finance minister nirmala sitharaman budget 2024 mobile phones and accesories price reduced the bcd)
 
यामुळे भारतात उत्पादनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. यासोबत मोबाईलसह इतर अनेक गोष्टींच्या किंमतीही कमी करण्यात आल्या आहेत. याचा उद्योगांवर सकारात्मक परिणाम होईल.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Income Tax New Regime : आयकर रचनेमध्ये मोठा बदल! तुम्हाला किती कर भरावा लागणार?

अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करण्यात आल्या?

2024 च्या अर्थसंकल्पात सरकारने मोबाईल आणि ॲक्सेसरीजवरील बेसिक कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवरून कमी करून 15 टक्के केली आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, भारतीय मोबाईल उद्योग आता मॅच्युअर झाला आहे. यासोबतच त्यांनी बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. मोबाईल फोन, मोबाईल पीसीडीए (प्रिंटेड सर्किट डिझाइन असेंब्ली) आणि मोबाइल चार्जिंगवर ही मूलभूत कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील 'या' बदलांचा कसा होणार परिणाम? 

कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल, ज्याचा फायदा ग्राहकांना होईल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी होईल. मोबाईल PCDA आणि चार्जरवरील BCD कमी केल्याने एकूण उत्पादन खर्च कमी होईल, ज्यामुळे उपकरणे स्वस्त आणि परवडणारी बनवता येतील.

हे वाचलं का?

हेही वाचा : Budget 2024 : तरुण-तरुणींना महिन्याला 5000 रुपये! अर्थसंकल्पात मोठी घोषणा

 

मोबाईल फोन आणि ॲक्सेसरीज स्वस्त झाल्यामुळे अधिकाधिक लोक त्यांचा वापर करू शकतील. यामुळे ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करता येणार आहे. या घोषणेमुळे स्थानिक उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच भारतात फोनचे उत्पादन वाढेल. ग्राहकांना अधिकाधिक ब्रँड्सचा वापर करता येईल आणि यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढेल. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.

सध्या चिनी ब्रँड्ससोबतच ॲपलही आपली अनेक उत्पादने भारतात बनवते. कंपनीने गेल्या वर्षी नवीन मेड इन इंडिया आयफोन लॉन्च केले होते. पण, अॅपल भारतात प्रो मॉडेल्स तयार करत नाही.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Recruitment 2024: IBPS मार्फत 'या' विशेष पदासाठी मेगा भरती! आजच करा अर्ज

 

कोणत्या दूरसंचार उपकरणांवर कस्टम ड्युटी वाढली?

2024 च्या अर्थसंकल्पात, सरकारने विशिष्ट दूरसंचार उपकरणांवरील बेसिक कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून वाढवून 15 टक्के केली आहे. ही वाढ टेलिकॉम PCBA वर करण्यात आली आहे. यामुळे दूरसंचार सेवांवर परिणाम होऊ शकतो. दूरसंचार उपकरणांवरील कस्टम ड्युटी वाढल्यामुळे नेटवर्कचा विस्तार मंदावेल. मात्र, यातून पीसीबीचे स्थानिक उत्पादन वाढेल, पण त्यासाठी वेळ लागेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT