‘त्या’ विधानामुळे जितेंद्र आव्हाड अडकणार? ठाण्यात पुन्हा एक गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध ठाणे शहरातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाची बदनामी केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही महिन्यातील जितेंद्र आव्हाडांविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. द केरळा स्टोरी चित्रपटाबद्दल बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान केलं होतं. त्यावर आक्षेप घेत ठाण्यात एकाने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आव्हाडांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी सलग गुन्हे दाखल झालेल्या जितेंद्र आव्हाडांवर आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी द केरळा स्टोरी या चित्रपटावर टीका केली आणि ‘या सिनेमाचा निर्माता कोण आहे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे’, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यावर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हे वाचलं का?
आव्हाडांविरुद्ध तक्रार देणाऱ्याचं म्हणणं काय?
45 वर्षीय संतोष दीनदयाल जायसवाल यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा सिनेमा खोट्या गोष्टींवर आधारित आहे. खोटा आहे. सदर चित्रपटाच्या डायरेक्टरला भर चौकात फाशी दिली पाहिजे. सदरचा सिनेमा बंद करायला हवा, असे बोलून चित्रपटाची बदनामी केली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड काय म्हणाले?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा दाखल होताच एक ट्विट केलं. “चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Exclusive: ‘माझ्यावर ठाकरेंचं प्रचंड ओझंय’, आव्हाडांनी सांगितला ‘तो’ इंटरेस्टिंग किस्सा
“माझा प्रश्न असा आहे की, कुरुळकर या अतिशय महत्त्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. आता कुरुळकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ, राज्य, राष्ट्र नसते. हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुळकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने रेल्वेसमोर घेतली उडी; कारण आलं समोर
“नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुळकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुळकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आतामात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे”, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT