Ganesh Chaturthi 2024 Puja: तुमच्याही घरी बाप्पा झालेत विराजमान, मिळवायचाय आशीर्वाद? 10 दिवस करा 'हे' 5 उपाय...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यंदा 07 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.

point

गणपती बाप्पाचा मिळवायचाय आशीर्वाद? हे आहेत 5 सोपे उपाय

Ganesh Chaturthi Puja: यंदा 07 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 10 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. पौराणिक मान्यतेनुसार भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला होता. या कारणास्तव, गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती दरवर्षी यादरम्यान साजरी केली जाते. (Ganesh Chaturthi 2024 Ways to seek Ganesha's blessings)

या दिवसात लोक घरोघरी गणपती बाप्पाची पूजा करतात. असे म्हणतात की, विघ्न दूर करणारा बाप्पा प्रसन्न झाला तर तो भक्तांना विशेष आशीर्वाद देतो. यामुळे दुःख आणि त्रास दूर होतो. अशा परिस्थितीत जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही काही उपाय करू शकता. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि आर्थिक संकट टाळतो. या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा : Santosh Banger: ''तुम्ही हुशाऱ्या झ#@X...', शिंदेंचे आमदार संतोष बांगरांची अधिकाऱ्याला शिवीगाळ

गणपती बाप्पाचा मिळवायचाय आशीर्वाद? हे आहेत 5 सोपे उपाय

दुर्वा अर्पण करा- विघ्नहर्त्याला दुर्वा अतिशय प्रिय आहेत. अशा वेळी गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी बाप्पाला दुर्वा अर्पण करायला विसरू नका. असे मानले जाते की दुर्वा श्रीगणेशाच्या डोक्यावर ठेवल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतो. याशिवाय गणपती बाप्पाला शमीची पाने अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जलाभिषेक करा- 10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवात पूजेला विशेष महत्त्व आहे. या काळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. या काळात गणपतीला गंगाजलाने अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते. यावेळी ओम गणेशाय नमः आणि ओम गं गणपतये नमः या मंत्रांचा 108 वेळा जप केल्याने गणपती बाप्पाची कृपा सदैव पाठीशी राहते.

हेही वाचा : PM मोदींनी आधी शिवाजी महाराजांची मागितली माफी, पण नंतर विषय नेला सावरकरांकडे...

नियमित जप करा- ज्योतिषाच्या मते, अडथळ्यांचा नाश करणाऱ्या श्रीगणेशाची पूजा करण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर सकाळी गणेश स्तोत्र किंवा गणेश चालीसा वाचा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील.

ADVERTISEMENT

मोदकांचा नैवेद्य दाखवा- ज्योतिषाच्या मते, गणपतीला मोदक खूप आवडतात. अशा वेळी त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवावा. याशिवाय भगवंताला पिवळे, लाल, गुलाबी किंवा रंगीबेरंगी कपडे घाला आणि दागिन्यांनी सजवा. असे केल्याने बाप्पा प्रसन्न होतो.

ADVERTISEMENT

पिवळे फुल अर्पण करा- ज्योतिषाच्या मते, श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्याला 10 दिवस पिवळा किंवा लाल चंदनाचा टिळक लावा आणि पिवळे फुल अर्पण करा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT