Sharad Mohol : लग्नाच्या वाढदिवशीच हत्या, शरद मोहोळला कुणी घातल्या गोळ्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad mohol shot dead by three people in pune
sharad mohol shot dead by three people in pune
social share
google news

Sharad Mohol Latest News : शुक्रवारची दुपार होती. साधारणतः दीड वाजेच्या सुमारास कोथरुडातील सुतारदरा परिसर गोळीबारचा आवाजाने हादरला. हा गोळीबार करण्यात आला होता कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर! दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी लग्नाच्या दिवशीच शरद मोहोळला संपवलं. नेमकं काय घडलं, तेच जाणून घ्या. (Sharad Mohol Shot dead in Kothrud)

ADVERTISEMENT

पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्न घडला. पुण्यातील नेहमी गजबलेल्या भागात शरद मोहोळची हत्या करण्यात आली. शुक्रवारी दुपारी (५ डिसेंबर) सुतारदरा भागात ही घटना घडली. या घटनेनंतर कोथरूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ला करणारे फरार झाले आहेत आणि कुणी हत्या केलीये, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शरद मोहोळला घरीच गाठलं

कोथरुडमधील सुतारदरा भागात शरद मोहोळ याचं घर आहे. त्याच ठिकाणी जाऊन आरोपींनी हल्ला केला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास शरद मोहोळ बाहेर असताना तीन जण दुचाकीवरून तिथे आले. क्षणार्धातच त्यांनी शरद मोहोळच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यात एक गोळी शरद मोहोळला लागली आणि तो जखमी झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना पैसै देण्यास भाग पाडले’, फर्नांडिसांना का द्यावे लागले साडे आठ कोटी?

गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शरद मोहोळला तातडीने परिसरातीलच सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मोहोळ समर्थकांची ससून हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी

गुंड शरद मोहोळचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणला. तिथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द केला जाणार आहे. दरम्यान, ससून रुग्णालया बाहेर त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.

ADVERTISEMENT

एका आरोपीची ओळख पटली

कुख्यात गुंड शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या तीन पैकी एका आरोपीचे नाव समोर आले आहे. साहिल उर्फ संतोष पोळेकर असं त्याचं नाव आहे. त्याने इतर साथीदारांसह शरद मोहोळवर हल्ला करून हत्या केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजितदादांच्या कार्यक्रमात भाजप आमदाराने पोलिसाच्या थोबाडीत मारली, नेमकं काय घडलं?

शरद मोहोळवर गोळीबार कुणी केला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शरद मोहोळच्या जवळच्याच लोकांनीच हा गोळीबार केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. जे लोक शरद मोहोळच्या जवळ होते, त्याच्यासोबत काम करत होते, अशांपैकीच काहींनी आर्थिक वादातून ही हत्या केली गेली असावी, असा संशय आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT