Video : खऱ्याखुऱ्या बंदुकीशी खेळ अन् अचानक सुटली गोळी, चिमुकलीचा…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

girl shot herself with gun cctv footage viral in social media florida story
girl shot herself with gun cctv footage viral in social media florida story
social share
google news

लहान मुलांवर नेहमीच लक्ष ठेवावे लागते. त्यांच्याकडे जरासे दुर्लक्ष झालं तर कोणती दुर्घटना होईल, हे सांगता येत नाही.अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेतील एका घरात सोफ्यावरती खरीखुरी बंदूक ठेवण्यात आली होती.या बंदूकीशी खेळत असताना चिमुकलीने स्वत: वरच गोळी झाडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे कुटुंबियातील अनेक व्यक्ती तिच्यासमोरच उपस्थित होते. तरी देखील त्यांना ही घटना टाळता आली नाही, त्यामुळे आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे. ही संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या घटनेने शहर हादरले आहे. (girl shot herself with gun cctv footage viral in social media florida story)

ADVERTISEMENT

ही घटना फ्लोरिडामध्ये घडली आहे. खरं तर मुलीचे आई-वडील हे आपआपल्या कामात व्यस्त होते. तर त्यांची छोटी मुलगी सेरेनिटी हॉलमध्ये खेळत होती. या हॉलमधील सोफ्यावर एक बंदूक ठेवण्यात आली होती. यावेळी खेळता खेळता सेरेनिटी ही सोफ्यावरील बंदूक उचलते. ही बंदुक उचलून सेरेनिटी स्वत:वरच गोळ्या झाडून घेते.

हे ही वाचा : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले ‘OBC ना…’

बंदूकीतून गोळी झाडल्याचा आवाज येताच शेजारी उभा असलेला घरातील व्यक्ती तिच्याजवळ जातो आणि घरातील कुटुंबियांना देखील या घटनेची माहिती देतो. त्यानंतर सर्व मदतीला धावतात, असा संपूर्ण घटनाक्रम घरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

सेरेनिटीने स्वत:वर गोळी झाडल्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ तिला निक्लॉस चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. खरं तर सेरेनिटीने स्वत:वर झाडलेली गोळी ही तिच्या हातात घुसली होती. त्यामुळे सुदैवाने ती या घटनेतून बचावली होती. डॉक्टरांनी तत्काळ हातात घुसलेली गोळी शस्त्रक्रिया करून काढल्याने ती बचावली आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात मुलीच्या शेजारी उभा असलेला व्यक्ती हा तिचा नातेवाईत होता. त्याचे नाव ओरलँडो आहे. ओरलँडोने विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. या अटकेनंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. या घटनेने सध्या शहरात खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : One Nation-One Election: 2024 मध्ये ‘एक देश-एक निवडणूक’ होणार? मोठी बातमी आली समोर…

या घटनेने एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की,पालकांनी त्यांच्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावेत. अनेकदा लहान मुले तोंडात कोणत्याही वस्तू घालतात. काही चिमुकल्यांनी तर कॉईन गिळल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT