सरकारला झटका, साईबाबांसह 5 जण निर्दोष, प्रकरण काय?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

प्रा. जीएन साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने निर्दोष ठरवले.
Nagpur High court Verdict on GN Saibaba and others
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नक्षलवाद संबंध प्रकरण

point

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल

point

पाच जणांची न्यायालयाकडून निर्दोष सुटका

GN Saibaba Latest News : प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांच्यासह पाच जणांना उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला, तर राज्य सरकारला झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या मंगळवारी (5 मार्च) प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला. (GN Saibaba acquitted in Maoist link case)

ADVERTISEMENT

जी.एन. साईबाबा आणि इतर चार आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश नागपूर खंठपीठाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचा हा निकाल राज्य सरकार आणि पोलीस दलासाठी झटका असल्याचे म्हटले जात आहे. 

UAPA कायदा लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणातून पुरावे विशेषतः डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले गेले नाही. तसेच सादर करण्यात आलेले पुरावे जी.एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, हे सिद्ध करू शकले नाही.

हे वाचलं का?

या आधारावर जी.एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका न्यायालयाकडून सुटका करण्यात आली.

"जीएन साईबाबा यांना कोर्टाने दोषमुक्त केले आहे. दहशतवादविरोधी कायद्याखाली केलेल्या कारवाईत त्यांनी दहा वर्षे तुरुंगात काढली आहेत. जीएन साईबाबांविरुद्ध जे डिजिटल पुरावे होते, त्यात त्यांनी छेडछाड केलेली आहे", अशी माहिती वकील हर्षल लिंगायत यांनी दिली. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT