Gold Price Today: सोन्याचा भाव पाहूनच म्हणाल, बाई... हा काय प्रकार? जाणून घ्या 1 तोळ्याची किंमत
Gold-Silver Rate Today : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोने आणि चांदीच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
Gold-Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोन्याच्या भावाने सध्या उच्चांक गाठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. अशावेळी आजच्या (30 ऑगस्ट)सोन्याच्या दरावर एक नजर टाकूयात. (gold-silver prices today 30 august 2024 in maharashtra mumbai pune know the details)
खरं तर, आज सोन्याच्या दरात 10 रूपयांनी घट झाली आहे. पण तरीही किंमती खूप जास्त वाढळेल्या आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Maharashtra Weather:महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट! तुमच्या शहरात आज IMD चा अंदाज काय?
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (29 ऑगस्ट 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 250 रूपये होता. पण आज यामध्ये 10 रूपयांनी घट झाली असून तो 73, 240 रूपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही 10 रुपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. एक किलो चांदीची किंमत 100 रूपयांनी कमी झाली असून 88,500 वरून 88,400 रूपये इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,140 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,930 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,140 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,930 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,140 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,930 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,170 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,270 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,000 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : राशीभविष्य 30 ऑगस्ट 2024: पाहा कसं आहे तुमचं आजचं भविष्य
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT