Gold Price Today : बाप्पा पावला! गणेशोत्सवाआधी सोनं किती झालं स्वस्त?
Gold Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात आज 4 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली आहे. सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गणपतीच्या आगमनाआधी सोने झालं स्वस्त
सोन्याच्या दरात घसरण
सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे
Gold Silver Price Today : गणेशोत्सवाला अवघे 3 दिवस उरले आहेत. येत्या 7 सप्टेंबरला घराघरात गणपतींचे (Ganpati Festival) आगमन होणार आहेत. या आगमनापुर्वीचे सोनं स्वस्त (Gold Rate) झालं आहे. सोन्याचे दर काहीसे खाली आले आहेत. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 494 होता. हाच दर बुधवारी 71 हजार 280 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे किंचित का होईना सोन्याचा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. (gold silver prices today 4 September 2024 in maharashtra mumbai 10 gram rate know the details ganpati festival)
भारतीय सराफा बाजारात आज 4 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली आहे. सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या म्हणजेच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71280 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 81038 रुपये प्रति किलो आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : अर्ज करूनही 'त्या' महिलांना बसणार झटका, 3000 कसे जाणार हातचे?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 3 सप्टेंबरला संध्याकाळी, 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 494 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज, 04 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 71 हजार 280 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सोन्याचा दर 214 रूपयांनी स्वस्त झाला आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, दागिने खरेदी करताना, सोने किंवा चांदीचे दर जास्त असतात कारण त्यात कर समाविष्ट असतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हे ही वाचा : Sharad Pawar भाजपला आणखी मोठा धक्का देणार?, घाटगेंपाठोपाठ 'हा' नेता घेणार हातात तुतारी?
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT