Monsoon: मुंबईकर चिंब भिजले… पावसाच्या जोरदार सरी, कोकणातही मुसळधार पाऊस!

मुंबई तक

ADVERTISEMENT

monsoon has entered Maharashtra almost 10 days late. Due to which heavy rains are falling in Mumbai and Konkan today. Also, the rains have made a strong presence in the suburbs.
monsoon has entered Maharashtra almost 10 days late. Due to which heavy rains are falling in Mumbai and Konkan today. Also, the rains have made a strong presence in the suburbs.
social share
google news

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला पावसाने (Rain) आज (24 जून) कोकणासह (Kokan) मुंबईत (Mumbai) दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि इतर उपनगरात सकाळपासूनच पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह ठाणे, कळवा, कल्याण येथे सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. (heavy rains falling in mumbai and konkan today rain made a strong presence in suburbs monsoon)

ADVERTISEMENT

या पावसामुळे परिसरातील वातावरण गारवा जाणवत आहे. काल (शुक्रवारी) सकाळी पाऊसाचा काही सरी बरसल्या होत्या. मात्र, नंतर दिवसभर पावसाने उसंती घेतली होती. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर सुखावले आहेत. या दरम्यान सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरले होते. दोन तास संततधार पाऊस पडल्यानंतर आता पाऊसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार, उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा

तळकोकणात मुसळधार पाऊस

दरम्यान, तळकोकणात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी 24 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन नसल्याने शेतकरी आणि नागरिक हैराण झाले होते. त्यात पाणीटंचाई बरोबरच शेतकऱ्यांनाही शेतीच्या कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे आजच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, माणगावसह अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे.

हे वाचलं का?

monsoon has entered Maharashtra almost 10 days late. Due to which heavy rains are falling in Mumbai and Konkan today. Also, the rains have made a strong presence in the suburbs.

मान्सून लांबल्याने पाणीटंचाई

दुसरीकडे यंदा मान्सून लांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणाचा मुबलक पुरवठा होत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच शेतकऱ्यांसमोर देखील दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. अशावेळी आता बळीराजासह सर्वसामान्यांचे आकाशाकडे डोळे लागून राहिले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘आमच्या छातीवर गोळ्या मारू दे, पण हटणार नाही’, वळसे-पाटील एवढे का संतापले?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून लांबला असला तरी आता तो महाराष्ट्रात दाखल झाला असून पुढील आठवड्यात राज्यात दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT