Monsoon Update : यंदाचा पाऊस शेतकऱ्यांना रडवणार? स्कायमेटच्या अंदाजाने चिंतेचं वातावरण

मुंबई तक

यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज संस्थेने (आज) सोमवारी आपला मान्सून पूर्व अंदाज वर्तविला आहे.

ADVERTISEMENT

According to, a private weather forecasting agency, Skymet, India is likely to receive below average rainfall this year
According to, a private weather forecasting agency, Skymet, India is likely to receive below average rainfall this year
social share
google news

Monsoon Update :

देशभरातील शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे. यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज संस्थेने (आज) सोमवारी आपला मान्सून पूर्व अंदाज वर्तविला आहे. स्कायमेटने यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 868.8 मिमीपेक्षा कमी 816.5 मिमी म्हणजेच 94% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटने सांगितले की, अल निनो व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींचा यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (According to, a private weather forecasting agency, Skymet, India is likely to receive below average rainfall this year.)

स्कायमेटने ट्विट करत म्हटले की, “पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या उत्तर भारतातील कृषीप्रधान राज्यांमध्ये या वर्षाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.” तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये स्कायमेटने म्हटले की, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत अपुरा पाऊस पडेल. भौगोलिक क्षेत्रानुसार स्कायमेटने देशाच्या उत्तर आणि मध्य भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका वर्तविला आहे.

गॅंगरेपचे आरोपी 13 पोलीस कर्मचारी निर्दोष; तपासात निष्काळजीपणा केल्याने कोर्टाने फटकारले

स्कायमेटने 4 जानेवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या वर्षाच्या पहिल्या अंदाजातही सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. संस्थेने हाच अंदाज आता कायम ठेवला आहे. भारत सरकारचा हवामान विभागही लवकरच मान्सूनबाबत वार्षिक अंदाज जारी करणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp