IAS Pooja Khedkar : अंपग असल्याचे दाखवून पूजा खेडकर बनली IAS अधिकारी? वाद काय?
Pooja Khedkar IAS Disability : 2023 च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्याबद्दल नवीन माहिती समोर येत असून, दृष्टीदोष असल्याचे दाखवून त्यांनी IAS उत्तीर्ण केल्याच्या मुद्द्याने वाद उभा राहिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात
अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर युपीएससीने हरकत घेतली होती
कॅटने विरोधात निकाल देऊनही वादग्रस्त प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले
Pooja Khedkar IAS Disability Certificate : खासगी ऑडी गाडी... गाडीवर लालबत्ती... जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले. हे सगळं केले ते प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी! वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. पण, त्यांच्याबद्दल आता नवीन माहिती समोर आलीये. (pooja khedkar ias handicapped or not?)
ADVERTISEMENT
20223 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राबद्दलही आता प्रश्न उपस्थित होत आहे. पूजा खेडकर यांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र दाखवून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी पद पदरातून पाडून घेतल्याचा दावा केला जात आहे.
पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाचा मुद्दा वादात
अशी माहिती समोर आली आहे की, पूजा खेडकर यांनी दृष्टीदोष असल्याचे म्हणजे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. युपीएससीने त्यांना सहा वेळा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं, पण त्या गेल्या नाही. त्यांनी दुसऱ्याच सेंटरमधून एमआयआय रिपोर्ट घेतला आणि तो सादर केला, अशी माहिती आहे. पूजा खेडकर यांना कॅट ने विरोध केला होता. त्यानंतरही त्यांना IAS म्हणून नियुक्ती देण्यात आली. याच मुद्द्यावरून आता वाद उभा राहिला आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत, पुण्यात शरद पवारांचं गणित बिघडणार?
पूजा खेडकर यांनी दृष्टीदोष असल्याचे दाखवून व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून युपीएससीची परीक्षा दिली.
पूजा खेडकर यांना आयएएसचा दर्जा मिळाल्यानंतर युपीएससीने वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले होते. पण, त्यांनी वेगवेगळी कारणे देत तब्बल सहा वेळा तपासणीसाठी जाणे टाळले.
ADVERTISEMENT
पूजा खेडकर यांनी एमआरआय सेंटरमधून घेतलेला रिपोर्ट सादर केला. ज्यावर युपीएससीने हरकत घेतली. त्यानंतर सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे कॅट मध्ये पूजा खेडकर यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? जरांगेंचा पहिल्यांदाच मोठा दावा
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी कॅटने पूजा खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला होता. मात्र, त्यानंतरही पूजा खेडकर यांनी सादर केलेले वादग्रस्त प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आणि त्यांची निवड वैध ठरवण्यात आली. त्यामुळे आता त्यांचे अपंगत्व आता वादग्रस्त ठरले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT