Parle-G चा ‘तो’ चेहरा बदलला, कोण आहे पॅकेटवरचा हा मुलगा? नेमकं घडलं काय?
जेव्हा-जेव्हा बिस्किटांची नावं घेतली जातात तेव्हा डोळ्यांसमोर पहिलं नाव पार्ले-जी (Parle-G) ब्रँडचं येतं. यासोबतच बिस्किटांच्या पॅकेटवर छापलेली ती पार्ले गर्ल आठवते. पण, आता पॅकेटवरून पार्ले गर्ल खरंच गायब झाली आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
ADVERTISEMENT

Parle-G Instagram Viral Post : जेव्हा-जेव्हा बिस्किटांची नावं घेतली जातात तेव्हा डोळ्यांसमोर पहिलं नाव पार्ले-जी (Parle-G) ब्रँडचं येतं. यासोबतच बिस्किटांच्या पॅकेटवर छापलेली ती पार्ले गर्ल आठवते. पण, आता पॅकेटवरून पार्ले गर्ल खरंच गायब झाली आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण, कंपनीने स्वतःच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एका नवीन चेहऱ्यासह पॅकेटचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये पार्ले गर्लऐवजी, एका इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सरचा फोटो दिसत आहे. एवढंच नाही तर नावही बदलले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया. (Is Parle-G’s that girl face changed who is this boy on the packet Instagram Viral Post)
स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जी ची सुरूवात!
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुरू झालेल्या पार्ले-जी बिस्किटचे चाहते काही कमी नाही आहेत. त्यामुळेच एका छोट्याशा कारखान्यात कँडीपासून सुरू झालेली पार्ले ही कंपनी आज 17000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची कंपनी बनली आहे. . या क्षेत्रात अनेक ब्रँड बाजारात आले आणि गेले पण पार्ले-जीचा दबदबा कायम आहे.
वाचा : Ram Mandir : “उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार, पण…”, राऊतांनी सांगितला प्लॅन
2011 मध्ये, निल्सन सर्वेक्षणानुसार, पार्ले-जी हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा बिस्किट ब्रँड म्हणून उदयास आला होता. त्याच्या पॅकेटवर एका गोंडस मुलीचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि ती या बिस्किट ब्रँडची ओळख बनली. पण नुकताच पार्ले कंपनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिस्किट पॅकेटचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पार्ले गर्लची जागा दुसऱ्याने घेतली आहे की काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?
पार्ले कंपनीने पार्ले गर्लच्या फोटो ऐवजी एका इंस्टाग्राम इन्फ्यूएन्सरच्या फोटोने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हा फोटो सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर झेरवान जे बनशाहचा आहे. केवळ फोटोतच नाही तर पॅकेटवर पार्ले-जी ऐवजी बनशाह-जी हे नावही लिहिले आहे. खरं तर, झेरवान बनशाहने त्याच्या एका व्हिडीओ फॉलोअरला विचारले होते की, जर तुम्ही पार्लेच्या मालकाला भेटलात, तर तुम्ही त्यांना पार्लेसर, मिस्टर पार्ले की पार्ले जी म्हणाल?