Heart Attack Cases: कमी वयात हृदयविकाराचा झटका! खरंच आहे कोरोना कनेक्शन?
कमी वयात कलाकारांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्यांनी बॉलिवूड तसंच इतर इंडस्ट्रींना मोठा झटका बसला आहे. गुरुवारी (14 डिसेंबर) संध्याकाळी चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली.
ADVERTISEMENT
Heart Attack Cases : कमी वयात कलाकारांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याच्या बातम्यांनी बॉलिवूड (Bollywood) तसंच इतर इंडस्ट्रींना मोठा झटका बसला आहे. गुरुवारी (14 डिसेंबर) संध्याकाळी चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. 47 वर्षांच्या श्रेयसची सध्या प्रकृती स्थिर आहे. (Is there really Corona connection of Heart Attack Increasing incidence of heart disease at a young age What is viral Tweet)
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हृदयविकाराच्या झटक्याची ही पहिलीच बातमी नाही. याआधीही अनेक कलाकारांना अगदी कमी वयात हृदयविकाराचा झटका आला आहे. चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला असो किंवा प्रसिद्ध बॉलीवूड गायक केके यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता.
वाचा: Sudhakar Badgujar : सलीम कुत्तासोबत डान्स, कोण आहे शिवसेना UBTचे बडगुजर?
The young actors suffering #heartattack post COVID era in the last two years.
Sushmita Sen
Sidharth Shukla
Chiranjeevi Sarja
Sunil Grover
Remo D’Souza
Vir Surryavanshi
Punneth Rajkumar
KKNo debates on the media channels, no agitation by any organization & no precautions by the…
— Amock (@Politics_2022_) December 15, 2023
हे वाचलं का?
तसंच, अभिनेत्री सुष्मिता सेन, चिरंजीवी सारजा, डान्सर रेमो डिसोझा, पुनिथ राजकुमार, वीर सूर्यवंशी या कलाकारांनाही हृदयविकाराचा झटका येऊन गेला. आता या सर्व घटनांमुळे याचं कोरानाशी कनेक्शन जोडलं जात आहे. अनेकदा लोक अशा प्रकरणांना पोस्ट कोव्हिडचा परिणाम मानत आहे.
हार्ट अटॅकचं कोरोना कनेक्शन? व्हायरल ट्वीटमध्ये नेमकं काय?
यासंबंधित अमोक (Amock) नावाच्या ट्वीटर अकाउंटवरून नुकतंच एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये असं लिहिलेलं आहे की, ‘गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीनंतर अनेक कलाकार कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत.’
ADVERTISEMENT
वाचा: Manoj Jarange : “फडणवीसांचा वापर, अजित पवारांना संपवायचं”, भुजबळांबद्दल खळबळजनक विधान
‘याबाबत मीडिया चॅनल्सवर कोणतेच डिबेट नाही, कोणत्याही संघटनेचे आंदोलन नाही आणि सरकारची खबरदारीही नाही. आता श्रेयस तळपदे जो अवघ्या 47 वर्षांचा आहे त्यालाही एका चित्रपटाच्या शूटिंगनंतर अटॅकचा सामना करावा लागला. ही वाढती प्रकरणे स्कॅनरच्या कक्षेत कधी घेणार? कोणतेही संशोधन नाही आणि कोणत्याही विभागाकडून सल्ला नाही. गुजरातमध्ये 17 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमावत आहे पण सर्वजण गप्प आहेत.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT