ISRO प्रमुख एस.सोमनाथ यांना कॅन्सर, Aditya L1 च्या लाँचिंगच्या दिवशीच निदान

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर आजार झाला आहे. सुर्य मिशनमधील आदित्य एल-1 च्या लॉचिंगच्याच दिवशीच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं,
isro chief s somnath dignosed with cancer aditya l1 launch mission sun
social share
google news

S. Somnath Dignosed With Cancer : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सर आजार झाला आहे. सुर्य मिशनमधील आदित्य एल-1 (Adity L1) च्या लॉचिंगच्याच दिवशीच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं, असा खळबळजनक खुलासा एस सोमनाथ (S. Somnath) यांनी एका मुलाखतीत केला आहे.  (isro chief s somnath dignosed with cancer aditya l1 launch mission sun) 

ADVERTISEMENT

एस.सोमनाथ यांनी एका मुलाखतीत या आजाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. चंद्रयान 3 मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळेसे आरोग्याशी संबंधित काही समस्या जावणत होत्या. मात्र तिथपर्यंत कोणता आजार झाला आहे, याची माहिती मिळू शकली नव्हती. यानंतर आदित्य एल1 च्या लाँचिंगच्या दिवशी आपल्याला या आजाराचे निदान झाला असल्याचे सोमनाथ सांगतात. यामुळे मी आणि माझं कुटुंब चिंतेत होते.दरम्यान सोमनाथ यांना कॅन्सर झाल्याचे सहकाऱ्यांना कळताच, त्यांना देखील मोठा धक्का बसला होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वत:ला आणि सहकाऱ्यांना सावरले. 

हे ही वाचा : BJP च्या हर्षवर्धन पाटलांचं खळबळ उडवून देणारं पत्रं

आदित्य एल 1 च्या लाँचिंगनंतर ज्यावेळेस सोमनाथ यांनी त्यांच्या पोटाचा स्कॅन केला, त्यावेळेस कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि उपचारासाठी ते चेन्नईला रवाना झाले होते. दरम्यान सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर झाला होता. हा आजार अनुवांशिकरित्या झाल्याचे उघड झाले आहे. 

हे वाचलं का?

कॅन्सरच निदान झाल्यानंतर सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बराच काळ त्यांच्यावर केमोथेरेपी करण्यात आली.मात्र आता त्यांचा आजार बरा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कॅन्सरशी झुंज देत असताना कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी साथ दिली असल्याचेही सोमनाथ यांनी सांगितले.

हे ही वाचा : 'गुवाहाटीत एअर होस्टेसचा विनयभंग कोणी केला?', असीम सरोदेंचा शिंदे गटावर आरोप

सोमनाथ यांनी पुढे सांगितले की, मला माहिती आहे उपचारासाठी खूप वेळ लागणार आहे. ही एक मोठी प्रक्रिया आहे. पण तरीही लढाई मी लढणार आहे. मी चारच दिवस रुग्णालयात होतो आणि आता या आजारातून खूप चांगला रिकव्हर झालो आहे. त्यानंतर मी माझे काम सुरु केले होते. कोणतीही वेदना न होता मी पाचव्या दिवशी काम सूरू केले होते, असे सोमनाथ सांगतात. 

ADVERTISEMENT

मी सतत वैद्यकीय चाचण्या आणि स्कॅन करत आहे. आणि आता मी पुर्णपणे बरा झालो आहे. माझं काम आणि इस्रोच्या मिशन आणि लाँचिंगवर पुर्ण लक्ष आहे. इस्रोचे सर्व मिशन पुर्ण करून श्वास सोडेन, असे सोमनाथ यांनी मुलाखतीत म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT