जालना हादरलं, पत्नी अन् 4 मुलींनी मिळून बापाला संपवलं, नेमकं काय घडलं?
Jalna Crime News : जालन्यात कौटुंबिक वादातून पत्नी आणि चार मुलींनी केली वडिलांची हत्या...जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथील धक्कादायक घटना; पत्नीसह चार मुलींवर खुनाचा गुन्हा दाखल...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नी अन् 4 मुलींनी मिळून बापाला संपवलं
जालन्यात खळबळ, नेमकं काय घडलं?
Jalna Crime News : जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे कौटुंबिक वादातून पत्नी आणि चार मुलींनी मिळून 40 वर्षीय व्यक्तीची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शालिकराम शिवाजी दांडगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मयताचे सावत्र भाऊ ऋषिकेश शिवाजी दांडगे (वय 26 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाण्यात पत्नीसह चार मुलींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबईची खबर : 20 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, मान्सून रखडल्याने मुंबईकरांसमोर मोठं संकट
पत्नी आणि चार मुलींनी केली वडिलांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, शालिकराम दांडगे हे लग्नानंतर सासरच्या जागेत टाकळी येथे घर बांधून पत्नी आणि मुलींसह राहत होते. काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. घटनेनंतर नातेवाइकांनी फोन करून ऋषिकेश दांडगे यांना शालिकराम यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर ते टाकळी येथे पोहोचले असता शालिकराम यांचा मृतदेह जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलिस पंचनाम्यादरम्यान मृतदेहाची पाहणी केली असता, शालिकराम यांच्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर, मनगटाजवळ तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. दोन्ही गुडघे आणि खुब्यांवर निळसर व्रण होते, तर जखमांमधून रक्तस्त्राव झाल्याचेही दिसून आले.
हेही वाचा : नगरसेवकांसाठी मोठी बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय









