नगरसेवकांसाठी मोठी बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
maharashtra cabinet decisions : राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नगरसेवकांबाबत देखील या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नगरसेवकांसाठी मोठी बातमी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
maharashtra cabinet decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 6 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नगरसेवकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या उमेदवारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. नेमके कोणते निर्णय मंजूर करण्यात आले आहेत? जाणून घेऊयात..
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्वाचा असा प्रकल्प नागपूर येथे राबविण्यात येणार. त्यासाठी हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प (High Energy Medical Cyclotron Project- NHECP) उभारणीस मान्यता. मध्य भारतातील एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प. गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. विविध रोगांचे, आजारांचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा वापर करता येणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
हेही वाचा : अभिनेत्री संचिताचा सिनेसृष्टीत मानसिक छळ? कोणी केले सनसनाटी आरोप?
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण २०२६ जाहीर. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर. ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास होणार. विविध योजनांचे एकत्रिकरण करून धोरण राबविण्यात येणार. स्वच्छ, निर्जंतुक व दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचे नियोजन. योजना चांगल्या रितीने राबविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन होणार. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)









