महाराष्ट्रात सहा महिन्यात 6 हजाराहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू
गेल्या सहा महिन्यात 6 हजार 437 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अवघ्या सात महिन्यात 106 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे ही आकडेवारी खुपच चिंताजनक आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात (maharashtra) रस्ते अपघाताच्या (Road Accident) घटना वाढत चालल्या आहेत. या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आता या रस्ते अपघातांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यात 6 हजार 437 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अवघ्या सात महिन्यात 106 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे ही आकडेवारी खुपच चिंताजनक आहे. (just in six montsh 6 thousand 437 people died in road accident in maharashtra state)
ADVERTISEMENT
राज्यात सध्या रस्ते अपघात प्रचंड वाढले आहेत. समृद्धी महामार्गावर तर अपघातांची मालिकाच सुरु असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. नुकताच बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर खाजगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.समृद्धी महामार्गावरचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि भीषण अपघात होता. तसेच अपघातातील मृतांची संख्या पाहून या घटनेची भीषणता लक्षात येते. दरम्यान समृद्धीवर घडलेल्या या भीषण अपघातामुळे रस्ते अपघात आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.
हे ही वाचा : MLA: सत्तेत सहभागी झाले तरी नरहरी झिरवळ म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार अपात्र होणार!’
रस्ते अपघाताची आकडेवारी
राज्यात गेल्या सहा महिन्यांत 5 हजार 897 रस्ते अपघाताच्या घटना घडल्या आहे. या अपघातात 6 हजार 437 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 106 जणांचा बळी घेतला आहे. तसेच 2019 ते मे 2023 या कालावधीत राज्य़ात 1 लाख 35 हजार 103 रस्ते अपघात घडले आहेत. या अपघातात 59 हजार 546 जणांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत डिसेंबर 2022 ते 7 जुलैपर्यंत 30 लाख 12 हजार 995 वाहने धावली आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गावर 51 अपघात घडले आहेत. या अपघातात 106 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत.
हे वाचलं का?
दरम्यान ही आकडेवारी पाहता रस्ते अपघात राज्यात प्रचंड वाढले आहेत. जरी हे अपघात मानवी चुकांमुळे झाले असले तरी ते रोखणे खूप महत्वाचे आहे. समृद्धीवर तर अपघाताची मालिकाच सुरू असल्याचा आऱोप होत असतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनांकडे लक्ष देऊन, त्या रोखण्यावर भर द्यावा, अशी मागणी सर्व सामान्य नागरीकांकडून होत आहे.
हे ही वाचा : ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्यासोबतच..’, फडणवीसांचा तात्काळ ठाकरेंवर पलटवार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT