Kalyan : 'नो पार्किंग'मधून गाडी उचलताच झोपला पोलिसांच्या गाडीखाली

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kalyan News : अनेकजण आपली दुचाकी रस्त्यावर लावतानाही घाबरतात. कारण वाहतूक पोलीस अनेकवेळा रस्त्यावर लावलेले वाहन टो (Tow Vehicles) करण्याची कारवाई करतात. असं जर झालंच तर, वाहन चालकांना आपलं वाहन सोडवण्यासाठी दंड (Penalty) भरावा लागतो आणि वाहन सोडवावं लागतं. पण या उलटच कल्याणमधील खडकपाडा परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. (kalyan news When Traffic police towing bike a man Slept under the truck )

सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तर, घडलं असं की वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेली दुचाकी टोइंग केल्याने संतापलेल्या एका वृद्ध व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला संताप व्यक्त केला. 

कल्याणच्या खडकपाडा परिसरात हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गाडी टोइंग केल्याने वाहतूक पोलिसांच्या गाडीसमोर झोपून या व्यक्तीने आपली दुचाकी परत मिळवण्याचा प्रयत्न केला. दुचाकी चालकाच्या या हट्टापायी वाहतूक पोलिसांना त्यांची गाडी पुढे काढता येत नव्हती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अखेर गाडी पुढे काढण्यासाठी वाहतूक पोलिसांसमोर कोणताही मार्ग राहिला नसल्याने त्यांनी त्या व्यक्तीची टोइंग केलेली गाडी सोडून दिली. त्यानंतर तो झोपलेला व्यक्ती गाडी खालून बाजूला झाला आणि दुचाकी घेऊन निघून गेला.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT