Dussehra 2024: सलग 3 दिवस सुट्टी! शाळा, कॉलेज आणि बँका बंद, सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती वाचा
Public Holidays For 3 Days In October 2024 : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सण उत्सव असल्याने अनेक ठिकाणी अननेक ठिकाणी बँकांना सुट्टी असणार आहे. 2 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरला सुट्टी होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
12 ऑक्टोबरला बँक बंद राहील की नाही?
13 ऑक्टोबरला कुठे राहणार सुट्टी?
14 ऑक्टोबरला या ठिकाणी असेल सुट्टी
Public Holidays For 3 Days In October 2024 : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सण उत्सव असल्याने अनेक ठिकाणी अननेक ठिकाणी बँकांना सुट्टी असणार आहे. 2 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरला सुट्टी होती. अशातच येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये देशाच्या अनेक राज्यात पब्लिक हॉलिडे (सार्वजनिक सुट्टी) असणार आहे. 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरपर्यंत देशात सुट्टी असणार आहे. बँक, कॉलेज, शाळा आणि कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी असणार आहे. (Know About Public Holidays Of October Month, Dussehra 2024 Bank Holiday Details)
या तीन दिवसानंतरही काही राज्यात बँकांना सुट्टी असणार आहे. शाळा, कॉलेज, कार्यालय आणि बँका कुठे बंद राहतील? जाणून घ्या सविस्तर माहिती. आज 11 ऑक्टोबरला पब्लिक हॉलिडे आहे. विजयादशमीनिमित्त संपूर्ण देशातील बँक, शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. अनेक खासगी कंपन्याही दसऱ्याला कर्मचाऱ्यांना सुट्टी देतात.
12 ऑक्टोबरला बँक बंद राहील की नाही?
12 ऑक्टोबरला बँका बंद असतील की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. 12 ऑक्टोबर 2024 ला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत. याशिवाय दसराही आहे. त्यामुळे पब्लिक हॉलिडे आहे. 12 ऑक्टोबरला शाळा, कॉलेज आणि अनेक कार्यालये बंद राहतील.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Optical Illusion : 4 की 5? या फोटोत किती महिला? डोकं लावा अन् अचूक उत्तर सांगा
13 ऑक्टोबरला कुठे राहणार सुट्टी?
13 ऑक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे रविवारी पब्लिड हॉलिडे असतो. या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. याशिवाय शाळा, कॉलेज, कार्यलयांनाही रविवारी सुट्टी असते. अशाप्रकारे 11,12 आणि 13 ला सुट्टी असल्याने सलग तीन दिवस पब्लिक होलिडे राहील.
14 ऑक्टोबरला इथे राहणार सुट्टी
14 ऑक्टोबर, सोमवारी गंगटोक (सिक्कीम) मध्ये पब्लिक हॉलिडे आहे. या दिवशी दुर्गा पूजेचा मुहूर्त असल्याने गंगटोकमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कार्यालये आणि बँक बंद राहणार आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Dussehra 2024 : कधीच येणार नाही पैशांचं टेन्शन! दसऱ्याला सुधारा 'या' 5 आर्थिक चुका
ADVERTISEMENT