Kolhapur : गोकुळ दूध संघाचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं, का झाला राडा?

भागवत हिरेकर

Kolhapur Gokul Dudh Sangh : ऑफिसमधील दोन इंटरकॉम फोन आणि साहित्याची तोडफोड केली. अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे एकच पळापळ सुरू झाली.

ADVERTISEMENT

mns workers vandelized gokul dudh sangh office in borude
mns workers vandelized gokul dudh sangh office in borude
social share
google news

-दीपक सुर्यवंशी, कोल्हापूर

Kolhapur Gokul Dairy MNS Workers : गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात मनसे पदाधिकार्यांनी राडा घातला. मनसे पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलवण्यात आलेलं होतं. त्याच दरम्यान पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या काचा फोडत राडा केला. अधिकारी आणि कर्मचारी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि तोडफोड केली, असं युवराज येडूरे यांनी सांगितलं.

गोकुळ दूध संघाने दर कपात केलेल्या गाईच्या दूधाचा दर पूर्ववत करावा, अशी मागणी मनसेने केली होती. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी गोकुळ दूध संघाच्या बोरवडे येथील दूध शीतकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांना 12 ऑक्टोबर रोजी निवेदन दिलं होतं. त्याची तात्काळ दखल न घेतल्यास संचालकांच्या घरावर गाई-म्हशींसह मोर्चा काढण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता.

हेही वाचा >> Manoj Jarange : ‘लावलं रताळू आली केळी’, जरांगेंवर गुणरत्न सदावर्तेंचा वार

इशारा देऊनही मागणीची कोणतीच दखल न घेतल्याने मनसे कार्यकर्ते बोरवडे येथील गोकुळ दूध संघाच्या शीतकरण केंद्रावर आले होते. यावेळी संकलन सुरु असल्याने शाखाप्रमुख विजय कदम यांनी मनसेचे कक्ष जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांच्यासह पाच जणांना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावले.

हे वाचलं का?

    follow whatsapp