libya floods : भयावह, थरकाप उडवणारं… अवघं शहरचं बनलं स्मशानभूमी, 6000 लोकांचे गेले जीव
Libya Floods : चक्रीवादळामुळे डेर्ना शहरात समुद्राच पाणी शिरुन सहा हजार पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. तर 10 हजारपेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. त्यामुळे आता सामुहिक स्मशानभूमी तयार करण्याची वाईट वेळ लिबियावर आली आहे.
ADVERTISEMENT

Libya Floods : लिबियातील पूर्वीकडील डर्ना शहराला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्याने गेल्या 24 तासात 1500 पेक्षाही जास्त नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. तर साडे पाच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 10 हजारपेक्षा जास्त लोकं बेपत्ता आहेत. जोरदार चक्रीवादळ झाल्याने पूर परस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांचा त्यामध्ये बळी गेला आहे. या वादळाचे डॅनियल(Storm Daniel) नाव असून बांधलेली धरणे फुटून लोकांचा मृत्यू झाला आहे.
धरणं फुटून पाणी शहरात शिरल्यामुळे अनेक लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. फक्त एका डर्ना शहरात पाच हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्रथम 2300 लोकांचा बळी गेल्याची शंका होती, मात्र परिस्थिती पाहता साडे पाच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.