Leopard: बिबट्याला खोलीत कोंडणारा.. शूर चिमुकला, अंगावर काटा आणणारी घटना CCTV मध्ये कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

बिबट्यापासून कसा काढला चिमुकल्याने पळ?
बिबट्यापासून कसा काढला चिमुकल्याने पळ?
social share
google news

Leopard CCTV: प्रविण ठाकूर, मालेगाव: मालेगाव शहरातील नामपूर रोड येथील पार्टी लॉन येथे एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव त्याच्याच प्रसंगावधानामुळे वाचला. एवढंच नव्हे तर त्या चिमुकल्याने जी समयसूचकता दाखवली त्याने बरीच हानीही टळली. (locking a leopard in a room a brave child the incident in malegaon was caught on cctv)

अंगावर काटा आणणारी घटना CCTV मध्ये कैद

नामपूर रोड येथील पार्टी लॉन येथे एका कार्यालयात मोहित अहिरे हा मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी त्या कार्यालयाचं दार हे उघडं होतं. तेव्हा अचानक बिबट्या घुसला. जेव्हा बिबट्या आत घुसला तेव्हा त्याचं बिबट्याकडे लक्ष गेलं नाही.. पण जेव्हा बिबट्या थोडासा आत गेला त्यावेळी मोहितने त्याला पाहिलं. 

सुदैवाने सोफावर बसलेल्या मोहितकडे बिबट्याचं लक्ष गेलं नाही.. अन तो सरळ पुढे जात राहिला. याचवेळी मोहितने जसा बिबट्या पुढे सरकला तसा सोफावरून खाली उतरत कार्यालयाच्या बाहेर धूम ठोकली. पण याचवेळी त्याने शिताफीने कार्यालयाचा दरवाजा देखील ओढून घेतला. जेणेकरून बिबट्याने पुन्हा माघारी फिरून त्याच्यावर हल्ला करू नये. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, मोहित कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तात्काळ आपल्या घराकडे गेले आणि घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा त्याच्या वडिलांनी देखील कार्यालयाजवळ जाऊन कार्यालयाचं शटर बाहेरून बंद केलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केलं.  दरम्यान, हा सगळा प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मालेगाव शहरातील जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन येथे ही घटना घडली. यावेळी गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर कार्यालयातून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्याला ब्लो पाइप मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करुन वनविभागाचे कर्मचारी तेथून घेऊन गेले. ज्यानंतर येथील सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT