धावत्या रेल्वेत तरूणाचा थंडीने गेला जीव, 300 किमीपर्यंत कुणालाच लागला नाही पत्ता!
मध्य प्रदेशात ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करताना थंडीमुळे गारठून एका तरूणाचा मृत्यू झाला. यावेळी ही घटना आजूबाजूच्या प्रवाशांच्या लक्षात यायलाही बराच वेळ गेला. हे प्रकरण कामायनी एक्स्प्रेसमध्ये घडले.
ADVERTISEMENT
Madhya Pradesh News : मध्य प्रदेशात ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करताना थंडीमुळे गारठून एका तरूणाचा मृत्यू झाला. यावेळी ही घटना आजूबाजूच्या प्रवाशांच्या लक्षात यायलाही बराच वेळ गेला. हे प्रकरण कामायनी एक्स्प्रेसमध्ये घडले. ज्यात हा तरुण सिंगल विंडो सीटवर बसून प्रवास करत होता. (Madhya Pradesh News A young man died due to cold in a running train Passengers get Know about it after 300 KM)
ADVERTISEMENT
बैतूल येथील रहिवासी असलेला हा प्रवासी जनरल बोगीच्या सिंगल विंडो सीटवर बसला होता. यादरम्यान, थंडीमुळे तरुणाचा सीटवरच बसलेल्या अवस्थेत मृत्यू झाला. यावेळी शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या ते लक्षातही आलं नाही. लोकांना वाटलं की, तो सीटवर बसून झोपला आहे.
वाचा : Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित
ट्रेनने सुमारे 303 किलोमीटरचे अंतर पार केले पण तरुण सीटवरच मृतावस्थेत पडून राहिला. इटारसीहून ट्रेन दमोहला पोहोचली तेव्हा तरुणाची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने लोकांना संशय आला. त्याच्या कानात इअरफोनही होते.
हे वाचलं का?
बऱ्याच वेळानंतर त्या बोगीत उपस्थित प्रवाशांना मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी रेल्वे कंट्रोलला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सोमवारी (18 डिसेंबर) सकाळी नऊ वाजता ट्रेन दमोह स्थानकात आल्यानंतर तरुणाचा मृतदेह रेल्वेतून बाहेर काढण्यात आला.
वाचा : Uddhav Thackeray : ठाकरेंचं दिल्लीत विधान; म्हणाले, “मोदींसमोर चेहरा…”
तरूणाच्या आकस्मिक मृत्यूचे डॉक्टरांनी सांगितले कारण!
तरुणाकडे सापडलेल्या तिकीटावरून त्याला बैतूलला उतरायचे होते असे दिसून आले. इटारसीहून बैतूलला जाण्यासाठी त्याने ट्रेन पकडली होती, मात्र घरी पोहोचण्यापूर्वी ट्रेनमध्ये प्रवास करत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तपासानंतर थंडीमुळे आलेल्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ADVERTISEMENT
यानंतर जीआरपीने त्याच्याजवळ सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली, त्यानंतर कुटुंबीयांनी सायंकाळी दमोह गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
ADVERTISEMENT
वाचा : Nanded : आठपानी सुसाईड नोट, चार नेत्यांची नावे; गळफास लावून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण एसी कंपनीत कामाला होता आणि त्या संबंधित कामानिमित्त तो चनेरा येथे गेला होता. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याचे कुटुंबीयांशीही बोलणे झाले होते. आता त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT