Maharashtra Weather: राज्यात धो-धो सुरूच! 'या' भागांना काढणार झोडपून, IMD अलर्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

point

'या' भागात पावसाची जोरदार बॅटिंग

point

मुंबईत पावसाची परिस्थिती काय?

Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा हजेरी लावण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे. त्याचबरोबर, आजही अनेक ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागात ‘यलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. (maharashtra Weather Forecast today 24 September 2024 IMD yellow alert to these districts weather report of mumbai pune)

ADVERTISEMENT

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज मंगळवारी (24 सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi : या राशीच्या लोकांच्या घरात सुख-शांती नांदेल! पण काहींच्या जीवनात साडेसाती, कारण...

'या' भागात पावसाची जोरदार बॅटिंग

आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

मुंबईत पावसाची परिस्थिती काय?

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटांसह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

राज्याभरामध्ये या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Badlapur: 'माझा पोरगा भोळा, गरीब गाय त्याला पोलिसांनीच...', पाहा अक्षय शिंदेची आई काय-काय म्हणाली!

मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेत हवामान विभागाने आज (24 सप्टेंबर) रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार, या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT