Maharashtra Weather Forecast : पुण्यासह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई तक

Mumbai Weather Updates : भारतीय हवामान विभागाने पुणे, ठाणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात २९ जुलै रोजी कसे असेल हवामान?
मुंबई, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात हवामान कसे असेल?

point

मुंबई, पुण्यात कसा असेल पाऊस?

point

मराठवाडा, विदर्भाचा हवामान अंदाज

Maharashtra Weather : पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नंदूरबार, नाशिकसह विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. हवामान विभागाने राज्यातील ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. (IMD Issues yellow Alert For 8 district of maharashtra)

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पुर सदृश्य परिस्थिती उद्भवली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला होता. पण, आता कमी झाला आहे. 

कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विर्दभात अमरावती जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईमध्ये कसे असेल हवामान?

मुंबई शहरात पावसाचा जोर ओसरला आहे. तर उपनगरामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी होत आहे. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp