हिवाळ्यात 'या' भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, जाणून घ्या हवामानाची महत्त्वाची अपडेट
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 1 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार
एकूण हवामानाची परिस्थिती जाणून घेऊयात
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 1 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 31 ऑक्टोबर रोजीच्या तुलनेत 1 नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज नसेल असं खालील तक्त्यात दिसून येत आहे. एकूण हवामानाची परिस्थिती कशी असेल याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Encounter झालेल्या रोहित आर्याच्या मनात होती 'ती' गोष्ट, मराठी अभिनेत्रीच्या WhatsApp चॅटने उडवली खळबळ
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या एकूण जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.










