Maharashtra Weather : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा! पहा IMD चा अंदाज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Weather Rain Forecast : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. तर, काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचंही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) , आज (6 ऑगस्ट) अनेक भागात पाऊस उघडलेला दिसण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग दिसेल. तर, विदर्भात विजांच्या गडगडांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. (Maharashtra weather live update news today 6th august 2024 rain alert in mumbai pune monsoon news marathi)

हेही वाचा : Kalyan Accident : भीमाशंकरला जाताना काळाची झडप! शिवसेना नेत्याचा भाचा आणि मामेभाऊ ठार

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा जोरदार इशारा! 

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

हेही वाचा : Sachin Waze : सचिन वाझेंच्या 'त्या' लेटरबॉम्बमध्ये जयंत पाटलांचं नाव कसं आलं?

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे चारही धरणे ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?

आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा तसेच सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभगाच्या अंदाजानुसार यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT