Maharashtra Weather : काही जिल्ह्यांतून पाऊस गायब, पण 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाचा वेग मंदावलेला आढळून येत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. अशातच जाणून घ्या आजच्या हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या पावसाचा वेग मंदावला
2 ऑगस्ट 2026 रोजी काही विभागांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाचा वेग मंदावलेला आढळून येत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. तर काही भागांमध्ये अगदी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि कोकण भागात पाऊस गायब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता 2 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील काही विभागांतील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. अशातच जाणून घ्या आजच्या हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : चंद्रपूर: आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या अन्नात पडली पाल, 31 जणांना विषबाधा
कोकण
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड मध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवविला आहे. जळगाव जिल्ह्यांत विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
