Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनने धुमाकूळ घातला आहे. काही दिवस कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 8 आणि 9 जुलै रोजी जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या मान्सूनने धुमाकूळ घातला
8 आणि 9 जुलै रोजी जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनने धुमाकूळ घातला आहे. काही दिवस कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 8 आणि 9 जुलै रोजी जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
हे ही वाचा : डोंबिवलीत शिंदे सेनेच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टरला मारहाण, Video व्हायरल
कोकण
कोकण विभागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि घाटामाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा अंदाज असून यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला.










