Maharashtra weather : कोकणासह राज्यभरात धो-धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना मोठा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra weather : पुढील काही दिवस कोकणात चांगल्या पावसाची शक्यता कायम राहण्याचा अंदाज आहे. अशातच 3 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनचा जोर कायम

point

3 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra weather : राज्यात मान्सूनने जोर धरलेला दिसून येत आहे, अनेक भागांत मुसळधार पावसाने धिंगाणा घातला आहे. कोकण आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस कोकणात चांगल्या पावसाची शक्यता कायम राहण्याचा अंदाज आहे. अशातच 3 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

हे ही वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर 

कोकण 

कोकणात अधिक प्रभावीपणे पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता आहे, या जिल्ह्याला रेड अलर्टचा अंदाज जारी केला आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवलेला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह नाशिक घाटमाथा परिसरात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. याच भागांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्टचा अंदाज जारी करण्यात आला. 

हे वाचलं का?