Maharashtra Weather : राज्यात हवामानाचा लपंडाव, कधी ऊन तर कधी पाऊस, 15 जिल्ह्यांचं खरं काही खरं नाही

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला, 2 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला. जाणून घ्या एकूण हवामानचा अंदाज पुढीलप्रमाणे...

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामानात मोठा बदल

point

राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात हवामानात काही प्रमाणात बदल होताना दिसतोय, राज्यातील विविध भागांमध्ये वातावरणात बदल अनुभवण्यास मिळत आहे. हवामान विभागाने राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 2 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी केला. जाणून घेऊयाच एकाच वेळी ऊन आणि पावसाचा एकत्रित अंदाज. 

हे ही वाचा : महिला क्रिकेटपटूसह तिच्या भावाला सेक्सटॉर्शन प्रकरणात अटक, ब्लॅकमेल करत 40 लाख रुपयांची फसवणूक; चॅट व्हायरल...

कोकण 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. हवामान विभागाने या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा अंदाज जारी केला. समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान जाणवेल.  

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. याच भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान विभागाचा अंदाज जारी केलाय.  

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. या जिल्ह्यांतील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तसेच तापमानात काही प्रमाणात घट होईल.  

हे वाचलं का?