Maharashtra Weather : गुढीपाडव्यादिवशी 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

मुंबई तक

Maharashtra weather : सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून राज्यात काही ठिकाणी उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. पण अशातच काही ठिकाणी उष्णतेऐवजी हलक्या पावसाचा देखील अंदाज जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात 19 मार्च 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

19 मार्च 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज

point

'या' विभागांना अवकाळी पावसाचा फटका

Maharashtra Weather : सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून राज्यात काही ठिकाणी उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. पण अशातच काही ठिकाणी उष्णतेऐवजी हलक्या पावसाचा देखील अंदाज जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत कोकणात तापमान सामान्य असल्याचा अंदाज होता, पण आता कोकण विभागातही अवकाळी पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. अशात 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्या दिवशी राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

हे ही वाचा : Gold-Silver Rate: चांदी तब्बल 1.77 लाखाने झाली स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला. तसेच रत्नागिरीत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.  

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच विभागात अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या विभागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp