कोकणात मुसळधार... तर सोलापूर आणि सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामानाची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 12 जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्रातील हवामानाची महत्त्वाची अपडेट

सोलापूर आणि सांगली वादळी वाऱ्यासह पाऊस
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामानाची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 12 जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानाची परिस्थिती अनुकूल असेल आणि पावसाचा जोर आणखी वाढू लागेल. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
हेही वाचा : पत्नीचं छाटलेलं मुंडकं स्कूटरवर ठेवून करत बसला Ride, पतीला आला अनैतिक संबंधाचा संशय अन्...
कोकणातील 'या' भागांत पूरजन्यस्थिती
कोकण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी आणि रायगडला पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात ढगाळ आणि दमट हवामान राहिल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
मराठवाड्यात बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश होते. यातील लातूर आणि धाराशिवमध्ये हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तर इतर ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वाट पहावी, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला.
मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली वादळी वाऱ्यासह पाऊस
तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरात काही भागात येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला. तर सोलापूर आणि सांगलीत वादळी वाऱ्यासह पाऊस दाखल होईल. पुणे, सातारा आणि कोल्हापूरात हलका ते मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता आहे.