Maharashtra Weather 31st March : राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Forecast : हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विदर्भात गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता
24 तासांत हवामानात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता
Maharashtra Weather Update : राज्यात आज हवामानात बदल दिसून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा प्रभाव राहील. विशेषतः सोमवारी, म्हणजेच उद्या, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही हलक्या पावसासह गडगडाट अपेक्षित आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीसह काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होऊन गारपीट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Beed : मशिदीत जिलेटीनचा स्फोट, मध्यरात्री बीड जिल्हा हादरला, दोघे ताब्यात, घटना नेमकी काय?
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि तीव्र हवामानामुळे होणाऱ्या बदलांमुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी बाळगावी, असं आवाहनही करण्यात आले आहे. पुढील 24 तासांत हवामानात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.










